Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि बचावाच्या पद्धती जाणून घ्या

मुलांसाठी बर्ड फ्लू किती धोकादायक आहे ,ह्याची लक्षणे आणि बचावाच्या पद्धती जाणून घ्या
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (18:40 IST)
कोरोना विषाणू अद्याप आपल्या मधून गेला नाही आणि एक नवीन बर्ड फ्लू ने शिरकाव करून प्रत्येकाला घाबरवून दिले आहे. देशातील हिमाचल, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, दिल्ली इत्यादी ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कावळे मृतावस्थेत आढळले आहे आणि लोकांनी कोंबडी आणि अंडीचे सेवन पूर्वीपेक्षा कमी केले आहे.या सर्वांमध्ये लोकांच्या मनात ही काळजी आहे की हे विषाणू माणसांसाठी आणि विशेषतः मुलांसाठी धोकादायक आहे का ?  ह्याची लक्षणे कोणती आहे, जेणे करून ते ह्याची ओळख आपल्या मुलांमध्ये करू शकतील. चला तर मग या विषयी माहिती जाणून घ्या.
 
वास्तविक बर्ड फ्लू हा  कोंबड्या आणि पक्ष्यांमध्ये आढळणारा एक आजार  आहे. हा आजार विषाणूंमुळे पसरतो. इतर प्राण्यांमध्ये हे क्वचितच आढळतात. बर्ड फ्लू माणसांना आणि मुलांना संसर्गित करू शकतो? तर ह्याचे उत्तर हो आहे, पण असे काही व्हायरस आहे जे माणसांसाठी घटक आहे. मुलांची प्रतिकारक शक्ती कमकुवत असते म्हणून हा आजार मुलांसाठी घातक मानला आहे.
 
तसे माणसांमध्ये आणि मुलांमध्ये बर्ड फ्लू होण्याची शक्यता कमी आहे, पण जर हे माणसांना होतो तर हे विषाणू डोळे, तोंड, नाक किंवा श्वास मार्गे माणसांच्या शरीरात शिरकाव करतो. या शिवाय बर्ड फ्लू असलेल्या पक्ष्यांना हात लावल्याने देखील आपणास संसर्ग होऊ शकतो. संपूर्ण जगात असे 16 देश आहे, जिथल्या लोकांना हा बर्ड फ्लू झाला आहे. बहुतांश प्रकरणे दक्षिण पूर्व एशिया आणि या नंतर इंडोनेशिया,मिस्र व्हियेतनाम आहे. परंतु भारतात आता पर्यंत असे कोणतेही प्रकरणे समोर आले नाही.    
 
* मुलांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे कशी ओळखावी -
ह्याची लक्षणे इतर फ्लू सारखीच असू शकतात. बर्ड फ्लू ची लक्षणे आहे नाक वाहणे,घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी,स्नायू दुखणे आणि कंजक्टिवाइटिस. तसेच जे गंभीर प्रकरणे असतात  त्यामध्ये नाकातून रक्त वाहणे, उलट्या, अतिसार आणि अपस्मार अशी लक्षणे दिसतात. संसर्ग झाल्याच्या 3 ते 5 दिवसानंतर किंवा 7 दिवसानंतर देखील ह्याची लक्षणे दिसू शकतात.आपल्याला देखील अशी लक्षणे दिसत असतील तर त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा. 
 
* बर्ड फ्लू टाळण्यासाठी काय करावं -
*काही काळ कावळे, कोंबड्या किंवा इतर पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नये. ह्यांच्या पासून लांब राहावं.
* स्वच्छतेची काळजी घ्यावी. 
* हातांना नियमितपणे धुवावे.
* आपण घरात पक्षी पाळीव केला आहे तर काही काळ त्याच्या जवळ स्वतः जाऊ नका आणि मुलांना देखील जाऊ देऊ नका. 
* नेहमी मास्क चा वापर करावा. 
 
तज्ज्ञ सांगतात की आपण कोंबडी आणि अंडी खाऊ शकता, पण ह्यासाठी आपल्याला त्याला 70 डिग्री तापमानावर  शिजवावे लागेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

NRI सोबत लग्न करत असाल तर नक्की वाचा