Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकघरातील 10 सोप्या आणि उपयुक्त टिप्स वापरा

स्वयंपाकघरातील 10 सोप्या आणि उपयुक्त टिप्स वापरा
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (21:08 IST)
स्वयंपाकाला सोपं  करण्यासाठी या काही टिप्स अवलंबवा आणि आपल्या रोजच्या जेवणाला नवीन चव द्या.
 
1 वाटलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवा,जेणे करून चव आणि रंग चांगले होण्यास मदत होते.
 
2 ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी त्यामध्ये थोडी साखर घाला.
 
3 टोमॅटो चा हंगाम नसल्यावर ग्रेव्हीमध्ये टोमॅटो सॉस किंवा केचप वापरू शकता.
 
4 खीर बनविण्यासाठी नेहमी जड भांड्याचा वापर करावा, दूध लागणार नाही.
 
5 मसाल्यात दही घालायचे आहे, तर दही चांगल्या प्रकारे फेणून घ्या आणि हळू-हळू मसाल्यात घाला.
 
6 भाजी चिरण्यासाठी नेहमी लाकडाच्या चॉपिंग बोर्डाचा वापर करावे. संगमरवरी स्लॅब वर भाजी चिरल्यानं चाकूची धार कमी होते.
 
7 भाज्यांचे साल जास्तीत जास्त पातळ काढण्याचा प्रयत्न करा.
 
8 घरात तयार केलेली आलं,लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट जास्तकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा गरम तेल आणि मीठ घाला.
 
9 अन्न वारंवार गरम करू नका, या मुळे त्यामधील पोषक घटक नाहीसे होतात. 
 
10 ग्रेव्ही साठी नेहमी पिकलेले लाल टोमॅटो वापरा, या मुळे रंग देखील छान येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पचन आणि प्रतिकारक शक्ती वाढवते हे खास फळ जाणून घ्या माहिती