Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दंतारोग्य आणि फ्लोराइड

दंतारोग्य आणि फ्लोराइड
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (16:11 IST)
दातांवर एक कठीण आवरण असते. हे आवरण खनिज पदार्थांचे बनलेले असते. यास फ्लोराइड असे म्हणतात. फ्लोराइडची विशेषतः अशी की, हे दातांची किडण्याची क्रिया धिमी करते. फ्लोराइडचा हा असर एनेमल खराब होण्यास रोखतो आणि खनिज पदार्थांच्या कमतरतेची पूर्तता करण्यास स्वाभावीक मदत करतो.
 
दातांद्वारे चावल्या जाणार्यात प्रक्रियेचे सूक्ष्म परीक्षण केल्यास असे पाहावयास मिळू शकते की फ्लोराइड असे काम करते? आणि त्याचा कोणता परिणाम होतो? फ्लोराइड मिश्रित पिण्याचे पाणी आणि मंजन हे फ्लोराइडचे चांगले स्त्रोत आहेत. आपल्या पिण्याच्या पाण्यात फ्लोराइड नसल्यास डॉक्टर आपणास याचे सप्लिमेंट देऊ शकतात. दातांच्या कमजोर भागावर लक्ष न दिल्यास तेथे छिद्र बनून भोजनाचे कण आणि मळ एकत्रित होतात आणि दात सडू लागतात. अन्य दातांतही ही समस्या पसरूशकते.
दात किडण्याची सुरूवात सर्वांत प्रथम चावण्यासाठी उपयोगात येणार्याआ दाताच्या आवरणापासून होते. वेळीच याचा उपचार न केल्यास दात पोकळ होतो, तर फ्लोराइड दात किडण्यास रोखते. म्हणूनच दातांच्या सुरक्षिततेसाठी फ्लोराइडयु्रत मंजनाचा उपयोग करावा.
डॉ. निखिल देशमुख

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थंडीत लहानग्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या...