Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवा

airlines traveller
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (18:25 IST)
बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या गटासह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो.बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या.

* अतिरिक्त औषधे जवळ बाळगा -
आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा. जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही.

* आपली स्थिती स्पष्ट करा-
आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील.

* अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या-
जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा.

* ऑनलाईन माहिती घ्या –
आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या योगासनांच्या नियमित अभ्यासाने सर्दी पडसं होत नाही