Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये रोगाचे उपचार दडलेले आहे

फळे आणि भाज्यांच्या सालींमध्ये रोगाचे उपचार दडलेले आहे
, सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:43 IST)
केळी खाल्ल्यावर त्याचे सालं फेकून देऊ नका. संत्र आणि मोसंबीच्या सालींना साठवून ठेवा. विविध देशात झालेल्या संशोधनात फळ आणि भाज्याच्या सालीमुळे नैराश्य पासून हृदयाच्या विकाराच्या आजारामध्ये बचाव करण्यासाठी प्रभावी उपचार सांगितले आहे. त्वचेला मऊ, डागमुक्त आणि चमकदार ठेवण्यासाठी सालांची भूमिका महत्त्वाची आहे.
 
* सालींमध्ये दम आहे- 
1  केळी - औदासिन्य आणि मोतीबिंदू. 
एका संशोधनात केळीचे साल मध्ये फील-गुड हार्मोन सेरोटोनिनची उपस्थिती नोंदविली आहे, जे अस्वस्थतेची भावना कमी करतं. या मध्ये ल्युटीन नावाचे अँटी ऑक्सीडेंट देखील आढळते, जे डोळ्यातील पेशींना अतिनील किंवा अल्ट्राव्हायहलेट किरणांपासून संरक्षण देऊन मोतीबिंद होण्याचा धोका कमी होतो.  
असं वापरावं -
केळीचे साल दहा मिनिटे स्वच्छ पाण्यात उकळवून पाणी थंड झाल्यावर पाणी गाळून पिऊन घ्या.  
 
2 नाशपाती-  पोट आणि लिव्हर रोग. 
एका संशोधनानुसार, नाशपातीचे साल व्हिटॅमिन सी आणि फायबरच्या व्यतिरिक्त ब्रोमलेन चे उत्कृष्ट स्रोत आहे.
शरीरातील चयापचय क्रिया चांगली ठेवण्यासह पोटात असलेल्या मृत उतीना शरीरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देतात. हे एंझाइम, लिव्हर रोगाला दूर ठेवते.
असं वापरावं -नाशपातीचे साल आवडत नसेल तर त्याचा ज्यूस, शेक किंवा सूप बनवून पिऊ शकतो.
 
3 लसूण - हृदयरोग, स्ट्रोक. एका संशोधनात समजले आहे की लसूणच्या सालीत फिनायलप्रॉपेनॉयड नावाच्या अँटी ऑक्सीडेंटची उपस्थिती दिसून आली आहे. रक्तचापासह लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (एलडीएल )म्हणजे बॅड कोलेस्ट्राल ची पातळी कमी करून हृदय रोग आणि स्ट्रोक पासून हे अँटी ऑक्सीडेंट रक्षण करतो.
असं वापरावं -
दर रोज सकाळी अनोश्या पोटी दोन पाकळ्या लसणाच्या चावून खावे साल न काढता. भाजी चटणी मध्ये देखील साल वापरावं.
 
4 संत्रं - मोसंबी - हृदय रोग, स्ट्रोक. 
संशोधनातून आढळले आहे की संत्र आणि मोसंबी सारख्या आंबट फळांच्या सालीत मुबलक प्रमाणात सुपर फ्लैवोनॉयड असत. हे बॅड कोलेस्ट्राल च्या पातळीला कमी करतो. हे अँटी ऑक्सीडेंट रक्तप्रवाहांच्या वेळी रक्तवाहिन्यांवर दबाव पडू देत नाही, हृदय रोग आणि स्ट्रोक पासून बचाव करतो.
असं वापरावं -भाजी किंवा सुपामध्ये साल किसून टाकू शकता. केक आणि मफिनच्या प्रयोगात देखील चांगला पर्याय आहे. ज्युस बनवून देखील पिऊ शकता.
 
5 भोपळ - कर्करोग 
एका संशोधनानुसार, भोपळ्याच्या सालींमध्ये आढळणारे बीटा केरोटीन फ्री रॅडिकल्सचा नायनाट करून कर्करोगाचा बचाव करतात. झिंक असल्यामुळे नखे बळकट करण्या व्यतिरिक्त अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांनी त्वचेचे रक्षण करत आणि रोग प्रतिकारक वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. 
असं वापराव -
साल कोवळं असेल तर भाजीसह शिजवून घ्या. कडक असेल तर सोलून उन्हात ठेवून वाळवून घ्या. ओव्हन मध्ये भाजून चिप्स सारखे खावे.
 
6 बटाटा - पचन प्रणालीशी संबंधित समस्या.
संशोधनात समजलं आहे की बटाट्याचे साल दररोज आवश्यक झिंक आयरन आणि व्हिटॅमिनसी आणि पोटॅशियम च्या कमतरतेला पूर्ण करतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासह पचन प्रणालीला चांगले ठेवतो. त्वचेच्या रंगात चमक आणण्यासह डोळ्याच्या खालील गडद मंडळे आणि काळे डाग दूर करण्यात मदतगार आहे.
 
असं वापरावं- बटाट्याची भाजी/ भरीत साली सकट बनवा. बारीक चिरून काही वेळ गरम पाणी आणि मिठाच्या पाण्यात ठेवा आणि उन्हात वाळवून चिप्स बनवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मसाला चहाचे फायदे