हृदय रोगाचे अनेक कारणे असू शकतात. त्या पैकी एक कारण अनुवंशिकी देखील आहे, अशा परिस्थितीत आपण आहाराद्वारे या स्थिती ला नियंत्रित करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काही अशे आहार जे हृदय रोग टाळण्यास मदत करू शकतात.
* वजनावर लक्ष द्या-
हृदयरोग आणि जास्त वजन यांच्या मधील नातं खूप दृढ आहे. या मुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका सर्वाधिक वाढतो. या साठी आपल्या वजनाला सुरुवाती पासूनच नियंत्रणात ठेवणे हाच चांगला मार्ग आहे. या साठी आहार आणि वर्कआउट, योगाचा अवलंब करू शकता.
* प्रोस्टेड मांसाहार घेऊ नये -
प्रोस्टेड मांस ते मांस आहे जे मांस जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी रसायन, प्रिझर्वेटिव्ह सह मिसळून ठेवले जाते. तज्ज्ञांचा मते जर आपण दररोज 50 ग्रॅम प्रोस्टेड मांस आहारात समाविष्ट करता, तर या मुळे हृदयघाताची शक्यताच नव्हे तर कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका देखील वाढतो.
* मीठ कमी खावे-
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तात आयरनची कमतरता होते आणि पोटात ऍसिडिटी वाढते. या मुळे भूक नसताना देखील भूक लागण्याची जाणीव होते. जेणे करून अधिक कॅलोरी शरीरात जाऊन लठ्ठपणा वाढतो.
* साखर कमी खावी-
जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा धोका देखील वाढतो. प्रौढांनी आणि मुलांनी ह्याचे सेवन आपल्या एकूण ऊर्जेच्या 10 टक्केपेक्षा कमी ठेवावे.
* सक्रिय राहा-
व्यायाम सुरू करण्यासाठी कोणतीही वेळ योग्य आहे. दररोजच्या व्यायाम केल्याने अनेक फायदे होतात. आपल्याकडे वर्कआउट करण्यासाठी पुरेसा वेळ नाही, तर आपण जेवण केल्यावर दररोज 10 मिनिटे वॉक करावा.
* तणावमुक्त राहा-
तणावामुळे देखील वजन वाढण्याचा धोका असतो,ज्यामुळे हृदय रोग होण्याची शक्यता जास्त असते.खरं तर तणाव जेवढे जास्त असेल, शरीराला स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल चा सामना करावा लागतो. तणावामुळे काही लोकांचे हृदय कमकुवत होतात आणि ते हृदय रोगाचे बळी होतात.