आयुर्वेदानुसार आपल्या आहारासह त्याची वेळ देखील महत्त्वाची आहे. खाण्या-पिण्याची योग्य वेळ आपल्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. चुकीच्या वेळी जेवण केल्याने आपल्या शरीराला पोषक घटकांचा फायदा मिळण्याच्या ऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो म्हणून योग्य वेळी योग्य आहार घेणं आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर सकाळी तर अन्नाचे पचन सहजपणे करतो पण सूर्य मावळल्यावर आपली पचन क्रिया मंदावते, म्हणून आपल्याला आपली आहार तालिका त्यानुसार बनवावी.
* न्याहारीची वेळ -
सकाळी 7 ते 8 ची वेळ न्याहारीसाठी उत्तम असते. ही गोष्ट लक्षात घ्या की सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत काही तरी खाऊन घ्यावं. जास्त काळ उपाशी राहिल्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम एक ग्लास कोमट पाणी आवर्जून प्यावं. या मुळे आपले पोट देखील स्वच्छ राहत आणि चेहऱ्यावर चमक देखील येते.
* दुपारचे जेवण -
दुपारचे जेवण दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान खावं. न्याहारी आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान किमान 4 तासांचे अंतर असावे.
* रात्रीच्या जेवणाची वेळ -
रात्री 7 ते 9 च्या दरम्यान खाणे आवश्यक आहे. हे लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी थोडं हलकं अन्न खावे. रात्रीच्या वेळी आपले शरीर अन्न पचन करण्यास सक्षम नसते. तसेच हे लक्षात ठेवा की रात्रीचे जेवण झोपण्याच्या 3 तासा पूर्वी खावं.