Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे
, मंगळवार, 18 मे 2021 (08:00 IST)
उन्हाळ्याचा हंगाम आला की कैऱ्या येऊ लागतात. तसेच या पासून चविष्ट व्यंजन देखील बनतात. चटणी,लोंजी सह कैरी चे पन्हे देखील बनत. पन्ह्याची चव मजेदार तर आहेच.उष्णता टाळण्यासाठी आणि आरोग्यासाठी इतर फायदे मिळविण्यासाठी देखील हे चांगले आहे.
 
कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे जाणून घ्या. 
 
1 उष्णतेचा दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी कैरीचे पन्हे फायदेशीर आहे.हे उष्माघातापासून रक्षण करत.शरीरात तरलता टिकवून ठेवत. 
 
2 उन्हाळ्यात दररोज हे प्यायल्याने पोटातील समस्यांपासून दूर ठेवत  आणि पचन टिकवून ठेवण्यास मदत करेल. हे एक उत्तम पाचक पेय आहे.
 
3 पोटातील उष्णतेचा ,नायनाट करण्यासह  पाचक रस तयार करण्यास मदत करत.
 
4 व्हिटॅमिन सीने समृद्ध असल्याने, यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करते.
 
5 टीबी, अशक्तपणा, कॉलरा सारख्या रोगांसाठी हे टॉनिक म्हणून कार्य करते. त्याचबरोबर घामातून शरीरातून सोडियम आणि झिंक ची पातळी देखील बनवून ठेवतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जास्वंदाचं फुल आरोग्य आणि सौंदर्यतेचा खजिना