Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुडघ्यांना बळकट करण्यासाठी चविष्ट आणि निरोगी पेय

गुडघ्यांना बळकट करण्यासाठी चविष्ट आणि निरोगी पेय
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (08:20 IST)
गुडघे पाय आणि शरीरासाठी एक महत्त्वाचा अवयव आहे. जे आपल्या वेग आणि पायाची क्षमता निश्चित करतो. वयामानाने गुडघे देखील कमकुवत होऊ लागतात. याचे मुख्य कारणे आहेत गुडघ्यात वंगण कमी होणे. जर आपल्याला आपले गुडघे दीर्घ काळापर्यंत चांगले राहावे असे वाटत आहे तर या चविष्ट आणि चमत्कारी पेया बद्दल जाणून घेऊ या. 
नैसर्गिकरीत्या बनविलेले हे पेय आपल्या गुडघ्यांच्या स्नायूंना बळकट करून त्यांना गुळगुळीत ठेवून त्यांची सक्रियता आणि लवचीकता राखण्यास मदत करतो. हे पेय कसे बनवतात जाणून घेऊ या. 
 
साहित्य-
1 कप ओट्स, 250 मिलिलिटर पाणी,2 कप चिरलेले अननस,40 ग्रॅम  मध,40 ग्रॅम बदाम,सुमारे 7 ग्रॅम दालचिनी, 1 कप संत्र्याचा रस.
 
कृती -    
सर्वप्रथम ओट्स शिजवून घ्या, नंतर अननसाचे तुकडे बारीक करून त्यांचा रस घालून घ्या. त्यामध्ये दालचिनी, बदाम,मध आणि संत्र्याचे रस एकत्र ज्यूसर मध्ये काढून घ्या. या मध्ये अननस आणि ओट्स मिसळून दाटसर मिश्रण बनवा. या मध्ये बर्फ मिसळून मिक्सर मध्ये फिरवून घ्या. 
व्हिटॅमिन सी, सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकाने समृद्ध हे पेय गुडघ्यासाठी फायदेशीर आहे. एकंदरीत हे आपल्या आरोग्यासाठी ऊर्जा आणि पोषण ने परिपूर्ण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या दिवसाची चांगली सुरुवात कशी करावी हे टिप्स अवलंबवा