rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या दिवसाची चांगली सुरुवात कशी करावी हे टिप्स अवलंबवा

Follow the tips on how to get your day off to a good start  divsachi changali suruvat kashi karaal ya tips awlmbva in marathi webdunia marathi
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (08:10 IST)
प्रत्येकाला आपला दिवस चांगल्या मार्गाने सुरू करावयाचा आहे, दिवस चांगला जाण्यासाठी एक नियमावली बनवावी. जसे की व्यायाम करणे, थोडाथोडा वेळ चालणे. असं केल्याने आपण दिवसभर स्वतःला ऊर्जावान अनुभवाल.शरीर निरोगी राहील तसेच संपूर्ण दिवस सकारात्मक मार्गाने सुरू करू शकाल. दिवसाची सुरुवात चांगली व्हावी या साठी काही टिप्स आहेत जाणून घेऊ या.
 
* सकाळी लवकर उठणे -
निरोगी माणसाला पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. काही लोक आळशीपणामुळे अधिक झोपतात आणि सकाळी लवकर उठत नाही. 16  वर्षाच्या मुलांना सुमारे आठ तासाची झोप घेणे आवश्यक आहे .सकाळी लवकर उठल्यावर आपल्या कडे आवश्यक कार्य करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. ध्यान आणि योगासाठी देखील वेळ काढू शकता. 
 
* आत्मविश्वास -
तज्ज्ञ सांगतात की जे लोक सकाळी लवकर उठून आपले सर्व कामे नियमानुसार करतात, त्यांच्या मध्ये आत्मविश्वास जास्त अधिक असतो, ते लोक मानसिक दृष्टया देखील बळकट असतात, त्यांना हे माहीत असते की स्वतःची  काळजी घेणं किती आवश्यक आहे.म्हणून ते दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करतात. 
 
* संयम- 
बरेच लोक कामात प्रथम अपयशी होतात, नंतर त्याच कामात यशस्वी होतात. या साठी संयम राखणे आवश्यक आहे. चुकल्यावर त्याची दुरुस्ती करावी त्या मध्ये काही बदल करावे. त्या गोष्टींपासून दूर पळून जायचे नाही. केलेल्या कामाचे परिणाम मिळण्यासाठी प्रतीक्षा करणे शिकले पाहिजे. जे आपल्या भविष्याची रूपरेषा ठरवेल. अशा प्रकारे आपण आपला दिवस चांगला सुरू करू शकतो. 
 
* व्यायाम- 
आपण लवकर उठून व्यायाम, प्राणायाम, आणि योग करतात तर आपल्यात कोणत्याही प्रकारचे तणाव येणार नाही. आपण स्वतःला ताजेतवाने अनुभवाल .आपले विचार देखील सकारात्मक होतील. आपण आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. अशा प्रकारे आपण दिवसाची सुरुवात चांगली करू शकता. 
 
* सकाळी आराम करा- 
सकाळी उठल्यावर घाई करू नका , आपण आरामशीर उठून 2 -3 मिनिटे बसून स्वतःला आराम द्या, असं केल्याने आपले मानसिक संतुलन चांगले राहील,घाई घाईने काम केल्याने कामात चूक झाल्यावर मानसिक संतुलन देखील ढासळू शकतो. म्हणून आरामात काम करा. ह्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. काही वेळ शांततेने घालवा. दीर्घ श्वास घ्या. या मुळे आपण चांगले अनुभवाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या कारणांमुळे होतो किडनीचा कर्क रोग कारणे जाणून घ्या