सकाळ संध्याकाळ चहासह स्नॅक्स घेण्यासाठी तळकट किंवा जंक फूड घेऊ नका. या मुळे आपले वजन वाढू शकते. या साठी आपण न्याहारीत भाजलेले स्नॅक्स वापरू शकता. हे आरोग्यदायी असून वजन कमी करण्यात मदत करते.
* मखाणे- या मध्ये सोडियमचे प्रमाण अधिक आहे. या मध्ये कार्बोहायड्रेट देखील अधिक प्रमाणात असतो. भाजून मखाणे खाल्ल्याने वजन कमी होते.
* हरभरे -हरभऱ्यात कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात आढळते. हरभरा हे प्रथिन आणि फायबरने समृद्ध आहे. हे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला वारंवार खाण्याची सवय असल्यास हरभरा खाणं हे चांगले पर्याय आहे. हे भूक कमी करून हे दातांच्या व्यायामासाठी देखील चांगले आहे.
* गव्हाचा सांजा - आपल्याला अधिक भूक लागली असल्यास गव्हाचा सांजाखाऊ शकता.या मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. जे वजन कमी करण्यात मदत करतो.
* शेंगदाणे- या मध्ये पोटेशियम, कॉपर,कॅल्शियम,आयरन आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळते . आपण हे भाजून खाऊ शकता. या मध्ये प्रथिन देखील मुबलक प्रमाणात आढळते. हे खाऊन आपले वजन वाढत नाही.