आजच्या काळात डोकं दुखी असणं ही सामान्य बाब आहे. डोकं दुखी अनेक कारणामुळे होऊ शकते. सध्या धकाधकीच्या जीवनात डोकेदुखीचे कारण तणाव आहे. या साठी काही उपाय सांगत आहोत जाणून घ्या.
* आरामशीर पद्धत वापरा - आपल्याला डोकं दुखी तणावामुळे असल्यास रिलैक्ससेशन पद्धती अवलंबवा. हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.या साठी आपण ध्यान करावे. असं केल्याने तणाव कमी होत. डोकं दुखी देखील कमी होते.
* खूप पाणी प्यावं- तज्ज्ञ सांगतात की जेव्हा तणावासह शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा डोकं दुखी वाढते.म्हणून पाणी भरपूर प्यावं. नेहमी आपल्यासह पाण्याची बाटली जवळ बाळगा. वेळोवेळी पाणी प्यावे. जेणे करून शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये.
* डोळ्यांना आराम द्यावा-या वेळी प्रत्येक जण कामाच्या तणावाखाली जात आहे. वर्क फ्रॉम होम मुळे लोकांना सतत लॅपटॉप किंवा कॉम्पुटर समोर तासन्तास बसावे लागत आहे. या मुळे डोळ्यांवर ताण येत आहे. डोळ्यांची काळजी न घेतल्याने डोळ्यात त्रास जाणवतो तसेच डोकेदुखीचा त्रास देखील होतो. कामाच्या दरम्यान मधून विश्रांती घ्या. डोळ्यांना मिटून बसा. असं केल्याने डोळ्यांना आराम मिळेल. कॉम्प्युटर वर काम करताना काही काही वेळाने डोळे थंड पाण्याने धुवून घ्या. असं केल्याने आराम मिळतो.
* मॉलिश करा- डोकं दुखी कमी करण्यासाठी मॉलिश हे चांगले पर्याय आहे. या साठी मान, कणपट्टी, डोकं,खांद्याची मॉलिश करा. असं केल्याने झोप देखील चांगली येते. आराम मिळतो.