हल्ली मास्क लावल्यामुळे श्र्वास घेताना तोंडातून निघणारी हवा परत तोंडात जाते ज्यामुळे तोंडाला वास येतो. अशात तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी हे सोपे उपाय जाणून घ्या-
खाण्या-पिण्याच्या सवयी
अशा वेळेस अधिक गोडाचे सेवन करणे टाळावे. तसेच चहा- कॉफीचे सेवन देखील कमी करावे. जंक फूडमुळे देखील तोंडाचा वास येतो. वास येणार्या पदार्थ खाणे टाळावे.
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे
भरपूर प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.
नियमित व्यायाम
तोंडाच्या दुर्गंधाशी याचा काय संबंध असा विचार करत असाल तर चुकीचं ठरेल कारण संपूर्ण शरीर निरोगी असेल तर छोटे त्रास आपोआप नाहीसे होतात. दररोज नियमाने व्यायाम केल्याने आराम पडेल.
आवर्जून टाळा
ज्यांना हा त्रास अधिक प्रमाणात असेल त्यांनी चहा-कॉफी, कांदा-लसूण याचे सेवन आवर्जून टाळावे.
पुरेशी झोप
लवकर झोपणे व लवकर उठणे ही दिनचर्येचा भाग असल्यास अती उत्तम ठरतं. तसेच दोन्ही वेळा ब्रश करणे आवश्यक आहे.
आपली लाइफस्टाईल योग्यरीत्या सुरु असून ही हा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.