Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळीच्या सणाला मधुमेहाची काळजी अशी घ्यावी

होळीच्या सणाला मधुमेहाची काळजी अशी घ्यावी
, शनिवार, 27 मार्च 2021 (19:27 IST)
कोणतेही सण असो गोडधोड खाणे होणारच. अवघ्या दोन दिवसावर होळीचा सण आला आहे. घर-घरात काही न काही गोड धोड बनणारच. अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यायला पाहिजे. अन्यथा आपल्या मधुमेहाची पातळी वाढू शकते. काही गोष्टींना लक्षात ठेवून आपण या सणाचा आनंद घेऊ शकता. 
 
* खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवा - सणासुदीच्या काळात आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. तळकट काही खाऊ नये.हे मधुमेहाची पातळी वाढवतात. मिठाई,गुझिया खाऊ नये.  
 
* गोड खावंसं वाटले तर काय करावे- घरातील सर्व मंडळींना गोड-धोड खाऊन बघून आपल्याला देखील गोड खावंसं वाटेल परंतु आपल्या इच्छेवर ताबा ठेवा. कारण आपले आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे. प्रथिन असलेले खाद्य पदार्थ जसे डाळी,पनीर,दही,ताक,याचे सेवन करावे. 
 
* शरीराला हायड्रेट ठेवा- होळीच्या आनंदाच्या मध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे देखील आवश्यक आहे. या साठी दिवसातून किमान 8 -10 ग्लास पाणी प्यावे. या व्यतिरिक्त अल्कोहोल आणि थंडाईचे सेवन करणे टाळावे. हे साखरेची पातळी वाढवतात.
 
* व्यायाम आणि नित्यक्रमाची काळजी घ्या- होळीच्या उत्साहात आपल्या नित्यक्रमाचे लक्ष द्या.या मुळे शरीर फिट राहील.शरीराला संपूर्ण दिवस सक्रिय ठेवा.जेणे करून आपण अधिक प्रमाणात कॅलरी घेतली असेल तर त्याचे काही दुष्परिणाम होणार नाही. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे