होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बऱ्याच लोकांना होळीच्या रंगामुळे डोळ्याचे आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत होळी खेळताना डोळ्याची आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. या साठी वेबदुनियाने या संबंधित खबरदारी घेण्या विषयी त्वचा रोग विशेषज्ञ(एमबीबीएस)डॉ जेएस छाबडा यांच्याशी चर्चा केली. चला जाणून घेऊ या डॉक्टर काय म्हणाले.
त्वचा विशेषज्ञ (एमबीबीए) डॉ. जेएस छाबरा म्हणाले की, होळीमध्ये वापरल्या जाणार्या रंगांमध्ये जड धातूची रसायने, काचेचे तुकडे आणि कीटकनाशके असू शकतात ज्यामुळे त्वचेला एलर्जी होऊ शकते. म्हणून अशा रंगांचा वापर करणे टाळा. या मुळे अनेक आजार उद्भवू शकतात.
होळीच्या रंगांमुळे त्वचेला होणारी समस्या-
1 ऍलर्जिक डर्मेटॉइटिस
2 सनबर्न
होळीच्या रंगांमुळे डोळ्याला होणारे त्रास -
1 कंजेक्टिव्हायटिस
2 कार्नियल घर्षण
होळी खेळण्यापूर्वी या समस्या टाळण्यासाठी अशी काळजी घ्या.
1 त्वचेला मॉइश्चराइजर क्रीम आणि सनस्क्रीन लावूनच निघावं.
2 आदल्यारात्री ऑलिव्ह तेल लावा.
3 नखांना पारदर्शक नेलपेंट लावा.
4 केसांना बांधूनच होळी खेळा.
5 ओठांना लिपबामचा जाड थर लावा.
6 संपूर्ण शरीराला झाकूनच होळी खेळा.
होळी खेळून झाल्यावर अशी काळजी घ्या.
1 अंघोळीसाठी थंड पाणी वापरा,गरम पाण्याने रंग घट्ट होऊन त्वचेला चिटकून बसतो.
2 कोरडे रंग काढण्यासाठी कोरडा कापड वापरा.
3 साबणाने घासून रंग सोडवू नका. रंग काढण्यासाठी कोरफड किंवा लिंबाचे क्लिन्झर वापरा. किंवा नारळाच्या तेलात कापूस भिजवून त्वचेवर लावून नंतर पाण्याने धुवून घ्या.
4 रॉकेल,पेट्रोलने रंग काढण्याचा प्रयत्न करू नका.
5 एका आठवड्या पर्यंत स्किन पिलिंग,पॉलिशिंग,पार्लर फेशिअल ,ब्लिचिंग, किंवा हेयर कलर वापरू नये.