निरोगी राहण्यासाठी योग्य आहारा सह योगा करणे देखील फायदेशीर आहे. यामुळे शरीराचा अधिक चांगला विकास होतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. अशा परिस्थितीत आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते. परंतु हे आसन करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. अन्यथा, फायद्या ऐवजी नुकसान सहन करावे लागू शकतात.चला तर मग जाणून घेऊ या. योगाच्या नियमांबद्दल .
1 सुरुवातीस कठीण आसन करू नका- जर आपण प्रथमच योगा करत आहात तर सोपे आणि सरळ आसन करा. जेणे करून स्नायूंमध्ये कोणतेही तणाव होणार नाही ही काळजी घ्यावी. अन्यथा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
2 योग्य कपडे निवडा- योगा करण्यासाठीचे कपडे योग्य असावे, जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर नसावे. कपडे असे निवडावे जे परिधान करून आपण सहजपणे योगा करू शकाल.
3 आसनची व्यवस्थित माहिती मिळवा- योगाचे आसन तेच करा ज्यांच्या बद्दल आपल्याला योग्य माहिती असेल. चुकीचे आसन केल्याने आपल्याला तोटा होऊ शकतो. या मुळे शरीरात काही समस्या उद्भवू शकतात. नेहमी असे आसन करावे जे करायला सोपे असतील .तसेच त्या आसन बद्दलची योग्य आणि व्यवस्थित माहिती असावी.
4 योगा करताना पाणी पिऊ नका- योग करताना पाणी पिणे टाळा. योग करताना शरीरातील तापमान वाढतो आणि या वेळी पाणी पिणं आपल्याला समस्येत आणू शकतात. खोकला,सर्दी,ताप येऊ शकतो. म्हणून योगा करताना पाणी पिऊ नका. नेहमी योग झाल्यावर 15 मिनिटानंतर पाणी प्यावे.
5 मोबाईल कडे दुर्लक्ष करा- नेहमी शांत मनाने आणि शांत ठिकाणी योगा करावे. आपले लक्ष फोन मध्ये असेल तर आपण व्यवस्थित योगा करू शकणार नाही आणि योग केल्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही. म्हणून योग करताना नेहमी फोन लांब ठेवा.