Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

चेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
, शनिवार, 27 मार्च 2021 (19:23 IST)
चेरीमध्ये पोटेशियम मुबलक प्रमाणात आढळते, हे अँटी इंफ्लिमेंट्री आणि अँटी ऑक्सीडेन्ट ने समृद्ध आहे. याचे अनेक फायदे आहे. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊ या 
 
1 निद्रानाश दूर करतो ‑या मध्ये मेलोटोनीन नावाचा हार्मोन आढळतो जो चांगली आणि शांत झोप देतो. हे आपले झोपण्याचा आणि जागण्याच्या चक्राला नियंत्रित करतो.
 
2 वजन कमी करतो- आहारतज्ज्ञ म्हणतात,की आपल्याला वजन कमी करायचे असल्यास चेरीचे सेवन आवर्जून करा.या मध्ये कमी कॅलरी आढळतात. व्हिटॅमिन ने समृद्ध आहे.मेटॉबॉलिज्म प्रक्रिया मजबूत करतो.या मध्ये असलेले पाण्याचे प्रमाण शरीरातील घाण बाहेर काढतात. 
 
3 उच्च रक्तदाब कमी करतो- आहारतज्ज्ञ म्हणतात की या मध्ये पोटेशियम चांगल्या प्रमाणात असतो हे शरीरातील जास्तीचे पोटेशियम काढण्यात मदत करतो. हे रक्तदाब पातळी कायम ठेवण्यास मदत करते. 
 
4 हृदय विकारांना प्रतिबंधित करतो- चेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सीडेंट खराब कॉलेस्ट्रालची पातळी कमी करण्यास मदत करतात आणि फ्री रॅडिकल्स शी लढा देतात. जे शरीराची सूज कमी करतो. चेरी हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करतो. 
 
5 त्वचेवरील डाग दूर करतात- या मध्ये असलेले अँटी एक्सीडेंटचे गुण फ्री रॅडिकल्स शी लढतात ज्यामुळे त्वचा तरुण होते.चेरी त्वचेवरील काळे डाग देखील दूर करते. या साठी चेरीचे फळ घेऊन चिमूटभर हळद आणि एक चमचा मधासह मिसळा ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा हे काळे डाग कमी करून त्वचा मऊ आणि सुंदर बनवते.
 
6 मधुमेहापासून बचाव करतो- या मध्ये असलेले अँटी इंफ्लिमेंट्री गुण शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात.तसेच शरीरातीलआधीपासूनच असलेल्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात देखील महत्वाची भूमिका बजावते.
 
7  पीएचची पातळी नियंत्रणात ठेवतो- चेरीमध्ये अल्कालाइन असतात.जेव्हा सह्रीरात अम्लीय पदार्थ वाढतात चेरी याला वाढू देत नाही.अपचन आणि ऍसिडिटी सारख्या पोटाच्या त्रासाला कमी करतात. तसेच पीएच पातळी नियंत्रणात ठेवतात.  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोप्या कुकिंग टिप्स