Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोप्या कुकिंग टिप्स

सोप्या कुकिंग टिप्स
, शनिवार, 27 मार्च 2021 (19:21 IST)
काही सोप्या किचन आणि कुकिंग टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे आपल्याला मदत मिळेल . चला तर मग या टिप्स अवलंबवून बघा.
 
1 किशमिश हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा हे अधिक दिवस ताजे राहील. वापरण्याच्या वेळी गरम पाण्यात घालून किचन टॉवेल वर काढून वाळवून घ्या. 
 
2 मेथीचा कडवटपणा घालविण्यासाठी थोडस मीठ घालून काही वेळ ठेवा. 
 
3 बदाम गरम पाण्यात 15 ते 20 मिनिट भिजत ठेवा साल आरामात उतरेल. 
 
4 चिरून ठेवलेल्या सफरचंदावर लिंबाचा रस लावून ठेवा सफरचंद काळं होणार नाही. 
 
5 लसूण गरम करा साल चटकन निघेल. 
 
6 मटार ताजी ठेवण्यासाठी प्लास्टिक बॅग मध्ये भरून ठेवा. 
 
7 रात्री छोले किंवा राजमा भिजत घालणे विसरला आहात तर उकळत्यापाण्यात चणे किंवा राजमा भिजत ठेवा. नंतर एका तासानंतर शिजायला ठेवा. 
 
8 वरण शिजवताना या मध्ये चिमूटभर हळद आणि शेंगदाण्याच्या तेलाच्या काही थेंब घाला वरण लवकर शिजेल. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवल्यानंतर चालण्याचे फायदे जाणून घ्या