कोणत्याही नात्यात मतभेद रुसवे-फुगवे असतातच. परंतु बऱ्याच वेळा असे आढळून येते की हे मतभेद किंवा भांडण इतके विकोपाला जातात की त्यामुळे नातं तुटतात आणि नात्यात दुरावा येतो. लहान गोष्टी देखील नातं तुटायला कारणीभूत असतात.या साठी काही उपाय आहे ज्यांच्या मदतीने आपण आपलं नातं चांगले आणि टिकवून ठेऊ शकतो. चला तर मग जाणून घ्या.
* चूक स्वीकारा- बऱ्याच वेळा असे दिसून येते की जोडीदार आपली चूक स्वीकारत नाही, त्यामुळे देखील नात्यात दुरावा येतो. जोडीदार आपसातच वाद विवाद करतात आणि आपली चूक मान्य करत नाही. जर आपल्या कडून काही चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि स्वीकारा. जेणे करून आपसातील वाद विकोपाला जाणार नाही.
* वाद करणे टाळा- बऱ्याच वेळा असे दिसून येते की आपसात वाद झाले, तर त्यावर बऱ्याच वेळा चर्चा केली जाते. किंवा त्या गोष्टीला अकारण ताणले जाते. असं करू नका. वाद विवाद करणे टाळावे. जेणे करून नातं टिकून राहील.
* हट्टी स्वभाव सोडा- काही लोक असे असतात जे फार हट्टी स्वभावाचे असतात, आपल्या हट्टी स्वभावामुळे कोणाचेही ऐकून घेत नाही .त्यांच्या अशा स्वभावाचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो.या स्वभावामुळे नातं तुटतात. आपला हट्टी स्वभाव बदलावा.
* अहं बाळगू नका- कोणत्याही नात्यात वाद आणि मतभेद होणं साहजिक आहे. मतभेद मध्ये मनभेद झाल्यावर नात्यात दुरावा येतो. नात्यात अहं येऊ देऊ नका या मुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.