rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, कच्‍चा आंबा आरोग्यासाठी फायदेशीर आहे

By
आपल्या आहारात कच्‍चा आंबा किंवा कच्ची कैरी समाविष्ट केल्याने आरोग्याविषयी फायदे मिळतात जाणून घेऊ या
.1 वजन कमी करण्यात फायदेशीर -या मध्ये कॅलरी कमी असते साखरेचे प्रमाण देखील कमी असतात .हे मेटॉबॉलिझ्म वाढवते. फॅट जाळते. दररोज याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. 
 
2 पोटाला आराम मिळतो- जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर हे पोटासाठी फायदेशीर आहे. गरोदरपणात मळमळत असल्यास ह्याचे सेवन केल्याने आराम मिळतो. पचन सुरळीत होते. 
 
3 त्वचेला आणि केसांना फायदेशीर- या मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते .हे शरीरातील विषारी टॉक्सिन काढतो .याचा नियमित सेवन केल्याने त्वचा आणि केसांमध्ये चमक येते. 
 
4 हृदयासाठी फायदेशीर -या मध्ये व्हिटॅमिन बी 3 आढळते याला मायसिन देखील म्हणतात. हे हृदयरोगाच्या समस्येला दूर करतो. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी दररोज कैरी चे सेवन करावे. 
 
5 दात बळकट होतात- या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते जे दातांना बळकट करण्याचे काम करतो. दातात चमक येते. दातांना बळकट करण्यासाठी दररोज कैरी चावून खावी.   
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डोळ्यांना आणि त्वचेला होळीच्या रंगाच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी टिप्स