Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

Holi 2021: होळी खेळण्यापूर्वी नक्की लक्षात असू द्या या 10 गोष्टी

ways to protect your Skin on Holi
, रविवार, 28 मार्च 2021 (09:10 IST)
होळी सण प्रत्येकाच्या जीवनात रंग भरण्यासाठी येतो. सर्व वयोगटातील लोक हा सण आनंदाने साजरा करतात. आपले जुने दु:ख, वैर विसरुन या दिवशी सर्व रंगात रंगून जातात. या दरम्यान अनेक आयोजन केले जातात. ज्यात नृत्य-गाणी, ठहाके, मस्ती सुरु राहते. तरी या मस्तीत काही सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे नाहीतर कोणत्याही अप्रिय घटनेच्या बळी पडल्यावर आविष्यभर हा सण नकोसा वाटू लागतो. जराशी चूक धोकादायक सिद्ध होऊ शकते. होळीच्या रंगात भंग पडू नये म्हणून या या 10 गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते-
 
1. रंगांमध्ये केमिकल असतं अशात त्वचेची विशेष काळजी घ्यावी. होळी खेळल्यानंतर आपली त्वचा शुष्क, कोरडी किंवा निर्जीव होऊ नये यासाठी मॉइश्‍चराइजर क्रीम अवश्य लावावी. क्रीमपेक्षा अधिक एक प्रभावी उपाय आहे- साय आणि लिंबू मिसळून लावणे. याने त्वचा कोरडी पडत नाही.
 
2. होळी खेळताना डोळ्यात रंग गेल्यास लगेच स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे. डोळ्यात गुलाबपाणी टाकू शकता. तरी आराम वाटत नसल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे. तसेच गॉगल किंवा चष्मा लावून होळी खेळणे अधिक उत्तम ठरेल.
 
3. केसांना रंगापासून वाचण्याची गरज असते. केस खुल्ले न सोडता बांधून घ्यावे. कॅप किंवा स्टाइलिश स्कॉर्फने केस कव्हर करणे अधिकच उत्तम.
 
4. मस्तीच्या भरात चेहर्‍यावर बलून फुटल्यास लगेच चेहरा आणि डोळे धुवावे. कारण रंगाचं पाणी डोळ्यात गेल्याने धोका वाढतो.
 
5. रंगांमध्ये कॉपर सल्‍फेट सारखे केमिकल असतात. याने डोळ्यात अॅलर्जी, अंधत्व, सूज, जळजळ या सारख्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकतं.
 
6. होळीच अनेक प्रकाराचे रंग बघायला मिळतात. त्यापैकी एक रंग म्हणजे सिल्‍वर. हा रंग इतर सर्व रंगापेक्षा अधिक धोकादायक असतो. यात एल्युमीनियम ब्रोमाइड आढळतं, ज्यामुळे त्वचेचा कर्करोग या सारखे आजार होण्याचा धोका वाढतो. तसंच काळ्या रंगात आढळणार्‍या लेड ऑक्साइडचा थेट प्रभाव किडनीवर पडतो.
 
7. होळी या सणानिमित्त भांगचे सेवन करण्याची परंपरा देखील आहे. होळीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्यारीत्या याचे सेवन केलं जातं. भांगचे सेवन करणे आोग्यासाठी योग्य नाही. भांगचे अधिक सेवन केल्याने अप्रिय घटना घडू शकते.
 
8. या दरम्यान बाजारात विकल्या जाणार्‍या मिठाईचे सेवन टाळावे. अनेकदा सणापूर्वी तयार केल्या जाणार्‍या मिठाईची गुणवत्ता चांगली नसते अशात घरी तयार पदार्थांचे सेवन करणे कधीही योग्य ठरेल.
 
9. अनेकदा मजा-मस्ती करताना वाद-भांडणं निर्माण होतात. यामुळे सणाची मजा नाहीशी होते. हा सण नाती सुधारण्यासाठी असतो अशात नात्यांमध्ये दुरावा येऊ नये याची काळजी घ्यावी. 
 
10. होळीवर स्वस्त रंग म्हणून केमिकल मिसळलेले रंग घेणे योग्य नाही. हर्बल कलर वापरावे. याने त्वचावर वाईट परिणाम होण्यापासून वाचता येतं. आपण हर्बल कलर घरी देखील तयार करु शकता. वेबदुनियावर आपल्याला हर्बल कलर्स तयार करण्याची सोपी विधी देण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भक्त प्रल्हादाची गोष्ट