होळीच्या रंगात भिजायलं अनेकांना पसंत असतं परंतू केमिकल मिसळलेल्या रंगाने अॅलजी होण्याची भीति असते. अशात वर्षातून एकदा येणार्या या सणाचा पुरेपुर आनंद घेता येत नाही. परंतू भीती हे समाधान नाही. यंदा हे 7 उपाय अमलात आणा आणि रंग खेळा आणि सोप्यारीत्या रंग सोडवा.
1. होळी खेळायला जाण्यापूर्वी त्वचेवर चांगल्याप्रकारे तेल किंवा तुपाने मसाज करावी. याने त्वचेवर दुष्प्रभाव दिसून येणार नाही.
2. होळी खेळताना हर्बल रंगात पक्का रंग मिसळून देखील वापरला जातो. अशात रंग सोडवण्यास खूप त्रास होतो. म्हणून चण्या डाळीच्या पिठात दही मिसळून रंग काढावा.
3. ऐलोवेरा औषधीच्या रुपात कार्य करतं. ऐलोवेरा जेल आपल्या चेहर्यावर लावता येऊ शकतं किंवा याचे ice cube तयार करुन देखील लावू शकता. हे लावल्यावर दहा मिनिटाने चेहरा धुऊन घ्यावा.
4. कडुलिंबाचा उपयोग करता येऊ शकतो. याचा फेसपॅक आपल्या त्वचेला रंगांपासून होणार्या अॅलर्जीपासून बचाव करेल.
5. चेहर्यावर जास्त प्रमाणात रंग लागला असल्यास कच्चं दूध, चंदन पावडर, बेसन आणि दही याचे मिश्रण तयार करुन चेहर्यावर लावावे. वाळल्यावर गार पाण्याने धुऊन घ्यावे.
6. होळी खेळल्यानंतर कॅलामाइन लोशन वापरु शकता. याने रंग सोडवण्यात मदत होते.
7. जर अॅलर्जी जास्त प्रमाणात असेल तर कपडे धुण्याच्या साबण मुळीच वापरु नका. याने त्वचासंबंधी त्रास वाढू शकतात. या ऐवजी कणिक आणि ऑलिव तेल मिसळून वापरु शकता.