Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dhulandi 2021 | धूलिवंदन सण साजरा करण्यामागील कारण

Dhulandi 2021 | धूलिवंदन सण साजरा करण्यामागील कारण
, रविवार, 28 मार्च 2021 (08:50 IST)
होलिका दहन केल्यानंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदन सण साजरा केला जातो. धुलेंडी हा सण धुलंडी, धुळवड, धुरड्डी, धुरखेळ, किंवा चैत बदी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. धूलिवंदन साजरा करण्‍यामागील कारण नक्की काय ते जाणून घ्या-
 
1. त्रैतायुगाच्या प्रारंभमध्ये विष्णूंने धूलि वंदन केले होते. याच आठवणीत धुलेंडी साजरी केली जाते. धूल वंदन अर्थात यात लोक एकमेकांना धूल लावतात.
 
2. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी लोक एकमेकांवर चिखल, धूळ फेकतात. पूर्वी धूल स्नान करत होते. तेव्हा चिकण माती किंवा मुलतानी माती शरीरावर लावण्याची परंपरा 
 
होती.
 
3. पूर्वी धुलेंडीच्या दिवशी टेसूच्या फुलांचा रंग आणि गुलाल एकमेकांवर टाकत होते. धूलिवंदनला त्या लोकांच्या घरावर रंग टाकण्याची परंपरा देखील असते ज्यांच्या कुटुंबात 
 
एखाद्या सदस्याचा मृत्यू झाले असेल. काही जागी या दिवशी वर्षभरात गमी झालेल्या लोकांच्या घरी जाण्याची परंपरा देखील आहे. त्यांच्या कुटुंबाच्या लोकांवर प्रतिकात्मक 
 
रुपाने रंग टाकून काही वेळ बसण्याची परंपरा अजून देखील आहे. 
 
4. पूर्वी होलिका दहन केल्यानंतर धूलिवंदनाच्या दिवशी प्रहलादाचे प्राण वाचले या आनंदात लोक एकमेकांना गळाभेट देत होते, मिठाई वाटत होते. आजही होळी मिलन 
 
करण्याची परंपरा कायम आहे पण प्रहलादाची आठवण कमीच लोक काढतात.
 
5. आता धुलंडीला पाण्यात रंग मिसळून होळी खेळली जाते. परंतू धुलंडीला कोरडा रंग तर रंगपंचमीला पाण्याची होळी खेळण्याची परंपरा आहे. तसेच महाराष्ट्रात होलिका 
 
दहन केल्यानंतर पुढील पाच दिवस धुळवड ते रंगपंचमी साजरी केली जाते. रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो. 
 
अनेक ठिकाणी होळीच्या दिवसांमध्ये भांग व थंडाई पिण्याची प्रथा आहे. तर नैवेद्यात पुरणपोळी, कटाची आमटी, गुजिया, इतर पदार्थ करण्याची परंपरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळीला भांगेचा नशा उतरवण्यासाठी घरगुती उपाय