कोणत्याही अॅप वर किंवा टीव्हीवर आपले आवडते प्रोग्राम बघताना आपण स्नॅक्स खात बसत असाल तर जरा सांभाळा. आपली ही सवय आपल्यासाठी नुकसानदायक ठरु. आम्ही आपल्याला सांगत आहोत की टीव्ही किंवा मोबाईल बघताना सतत पोटात काही घालत राहण्याने काय नुकसान होतात ते-
1 रोगांचा धोका-
अनेक शोधांप्रमाणे तरुण जर टिव्ही बघताना स्नॅक्स खातात तर त्यांच्या शरीरात मेटाबोलिक सिंड्रोमची आशंका अधिक असते. यामुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाब, हाय ब्लड शुगर, कंबरेत चरबी आणि कोलेस्ट्रॉल वाढणे सारख्या समस्या उद्भवू लागतात.
2 क्षमतेहून अधिक प्रमाणात खाणे -
हे तर आपल्यालाही जाणवत असेल की टिव्ही बघताना स्नॅक्स खाताना लोकं आपल्या गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सेवन करतात. याचा शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो.
3 अपचन -
टिव्ही बघताना अनेक लोकं कोणत्याही पोझिशनमध्ये असले तरी तोंडात खाद्य पदार्थ टाकत असतात अशात चुकीच्या पोझिशनमध्ये पोटात अन्न गेल्याने अपचनाचा त्रास उद्धभवतो.
4 लठ्ठपणा -
क्षमतेपेक्षा अधिक आणि चुकीच्या पद्धतीने बसून खाल्लयाने लठ्ठपणाची समस्या देखील वाढते.