बॉलिवूड स्टारपेक्षा जास्त मानधन घेतो हा दाक्षिणात्य सुपरस्टार

गुरूवार, 19 मार्च 2020 (12:40 IST)
जगभरात रणबीर कपूर, वरुण धवन आणि प्रभास या तीन अभिनेत्यांचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. पहिली दोन नावे त्यांच्या डेब्यूपासूनच हॉट टॉपिक राहिली आहेत, मात्र प्रभास एकमेव असा अभिनेता आहे, जो आपल्या भारतीय लोकप्रितेसोबत आता सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे आहे.
 
'साहो'च्या यशानंतर, प्रभासला केवळ तेलुगू/तमिळ भाषेतूनच नाही तर हिंदी भाषिक लोकांकडूनदेखील व्यापक लोकप्रियता मिळत आहे. सूत्रांच्या मतानुसार, प्रभासला हिंदी मार्केटमध्ये आपले समकालीन रणबीर कपूर आणि वरुण धवन यांच्याहून अधिक रक्कम मिळते. दर्शकांमधल्या आपल्या लोकप्रितेसोबतच हिंदी चित्रपट निर्मात्यांमध्ये असलेल्या बोलबालमुळे प्रभास एक पाऊल पुढे आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत आहेत. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वेच्च शिखरावर पोहोचली आहे. आपल्या 14 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत प्रभासने केवळ 19-20 चित्रपट केले आहेत.
 
प्रभास राजकुमार हिराणींचा मोठा चाहता आहे. अख्खे जग प्रभासचे चाहते असताना, बॉलिवूडमधील शाहरुख, सलमान आणि दीपिकाचा तो फॅन आहे. तर हॉलिवूडमधील रॉबर्ट डिनीरो यांचा तो मोठा फॅन आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अभिनेते विक्रम गोखले यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल