काकडीत खूप अधिक प्रमाणात पाणी असल्याचे सर्वांनाच माहीत असेल परंतू काकडीसह इतर पाणी आढळणारे फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये हे बहुतेकच जणांना माहीत असेल.
काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे कारण याने शरीराचा ग्लाइसेमिक इंडेक्स वेगाने वाढतं ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. याचे सेवन केल्यानंतर पाणी पिण्याने शरीरातील मेटाबॉलिझम बिघडतं आणि अपचन सारखी समस्या येते.
पोषक तत्त्व आढळणार्या काकडीत 95 टक्के पाण्याचे प्रमाण असतं. उन्हाळ्यात काकडीचे सेवन पाण्याची कमी दूर करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नीशियम आणि सिलिका सारखे पोषक तत्त्व असतात. आपण काकडी खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलास शरीर हे पोषक तत्त्व शोषित करू पात नाही.
तसेच लगेच पाणी पिण्याने बॉडी GI वेगाने वाढतं ज्यामुळे शरीरातील पचन क्रिया हळू होते.