Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

World No Tobacco Day: आपण पॅसिव्ह स्मोकर तर नाही

World No Tobacco Day: आपण पॅसिव्ह स्मोकर तर नाही
भारतात सार्वजनिक स्थळावर स्मोकिंग करण्यावर बंद आहे तरी दररोज आपण बघतोच की हा नियम मोडला जातो. अशात आपण सिगारेट ओढत नाही आणि लांब कोणी स्मोक करत असल्यास आपल्यालावर त्याचा प्रभाव पडणार नाही असा विचार करत असला तर हे चूक आहे. वर्ल्ड नो टबॅको डे वर जाणून घ्या कशा प्रकारे आपल्या आरोग्यावर पडत आहे प्रभाव-
 
आपल्या गल्ली, रस्ता, पब्लिक ट्रांसपोर्ट, रेस्टॉरंट्स सारख्या अनेक जागांवर लोकं बिंदास सिगारेट ओढताना दिसतात. वर्क प्लेसवर देखील लोक यासाठी जागा शोधून घेतात. अशात आपल्या जवळपास उभारून सिगारेट ओढणार्‍याचा धूर आपल्यापर्यंत पोहचत असल्यास आपण पॅसिव्ह स्मोकर आहात. डॉक्टर्सप्रमाणे पॅसिव्ह स्मोकिंग देखील अॅक्टिव्ह स्मोकिंग एवढी धोकादायक आहे.
 
डॉक्टर्सप्रमाणे तंबाखूच्या धुरात 7000 केमिकल्स असतात ज्यामुळे 50 प्रकाराच्या कर्करोग होण्याची शक्यता असते. आपल्या जवळपास स्मोकिंग होत असल्यास यातील नुकसानदायक कंपाउंड्स पॅसिव्ह स्मोकरच्या लंग्समध्ये पोहचतात आणि अधिक काळापर्यंत राहतात.
 
जराश्या वेळात किंवा दिवसातून एकदा असं होत असल्यास काही फरक पडणार नाही, जर आपण असा विचार करत असाल तर आपण चुकीचा विचार करताय.  जरा वेळ का नसो पण या केमिकल्सच्या संपर्कात येणे हानिकारक आहे.
 
एक्सपर्ट्सप्रमाणे पॅसिव्ह स्मोकर्सला फुफ्फुसे, मान आणि शिर याच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि फुफ्फुसे संबंधी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
पॅसिव्ह स्मोकिंगहून वाचण्यासाठी आपल्याला स्वत:ला सजग होण्याची गरज आहे. जवळपास कोणी सिगारेट ओढत असेल तर त्याला असे करण्यापासून रोखावे. असे करणे शक्य नसल्यास त्या जागेवरून लांब जावे किंवा रुमालाने आपलं नाक झाकावं. कोणाही घरात सिगारेट ओढण्याची परवानगी देऊ नये. एखाद्या रेस्टॉरंट्स, मॉल, सिनेमा हॉलमध्ये कोणी स्मोक करत असेल तर तक्रार करावी. अशाने आपण स्वत:ची आणि इतरांची मदत कराल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिरून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान