आपण विविध कारणांसाठी डॉक्टरांकडे जातो. अनेकजण नियमित आरोग्य तपासणी करून घेतात. पण तपासण्यांआधीची एखादी कृती आपल्या अहवालावर परिणाम करू शकते. आरोग्य तपासणीआधी आपल्याकडून होणार्या चुकांविषयी...
डॉक्टरांकडे गेल्यावर रक्तदाबाची तपासणी होतेच शिवाय वजनही केले जाते. रक्तदाबाची तपासणी करण्याच्या किमान तासभर आधी कॉफी किंवा कार्बनयुक्त पेये पिऊ नयेत. कोणत्याही कॅफेनयुक्त पेयाचा आपल्या रक्तदाबावर परिणाम होत असल्याने रक्तदाब कृत्रिमरीत्या वाढतो. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाण्याआधी औषधे घेऊ नका. औषधांच्या परिणामांमुळे आजाराची लक्षणे दबली जाऊन डॉक्टरांना योग्य निदान करता येत नाही.
त्वचा तज्ज्ञांकडे जाताना नखांना नेलपॉलिश लाऊ नका. नखांच्या रंगावरून बर्याच विकारांचे निदान करता येते. तसेच मेकअपही करू नका. कोलेस्टरॉल चाचणीआधी मपान केल्यास ट्रायग्लिसराइड्सच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. कोलेस्टरॉल चाचणी करण्याच्या 24 तास आधी मद्यपान करू नये. यासोबत गोड, तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. अतिखाणे टाळावे.