Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिळी पोळी खाण्याचे फायदे जाणून हैराण व्हाल

शिळी पोळी खाण्याचे फायदे जाणून हैराण व्हाल
Stale Roti Benefits शिळे अन्न आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 15 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा, अॅसिडिटी, गॅसची समस्या उद्भवते. पण गव्हाची शिळी भाकरी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरे आहे. वास्तविक गव्हात पाणी घालून पीठ तयार केले जाते आणि जेव्हा ते विस्तवावर शिजवले जाते तेव्हा त्यातील पाणी भाप बनून उडून जातं.
 
या प्रकारे पोळीत नमी राहत नाही आणि याची शेल्फ लाइफ वाढते आणि पोळ्या दुसर्‍या दिवसार्पंत खराब होत नाही. दररोज सकाळी दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्याने एसिडिटी, गॅस, ब्लड प्रेशर यासह डायबिटीज यापासून देखील सुटका मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते पोळ्यांमध्ये व्हिटॅमिन-बी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आढळते. शिळ्या पोळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जाणून घ्या त्याचे काही फायदे-
 
रक्तदाब संतुलित ठेवतं
शिळी पोळी सकाळी थंड दुधासोबत खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या दूर होते. सकाळी 10 मिनिटे दुधात बुडवून शिळी रोटी खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहते.
 
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
रात्री दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. शिळ्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट फुगणे आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
 
मधुमेह नियंत्रणात राहतो
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शिळी पोळी खूप फायदेशीर आहे. दिवसभरात कधीही दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहते.
 
शरीराचे तापमान कमी करते
दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात दुधात भिजवलेल्या शिळ्या पोळ्या खाल्ल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते.
 
Disclaimer: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga Asanas After Meals For Digestion: अन्न लवकर पचण्यासाठी हे योगासन करा