Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून आपणांस आश्चर्यच होणार, काय आहे फायदे जाणून घेऊ या...

webdunia
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (13:35 IST)
आजच्या काळात असे फार कमी लोकं आहे ज्यांना खाली जमिनीवर बसणं आवडतं. बरेच लोकं खुर्ची वर बसून आपले काम करण्यास प्राधान्य देतात आणि जेवण सुद्धा खुर्ची टेबलावर बसूनच करतात. पण आपणांस ठाऊक आहे का की खुर्ची वर बसल्याने आपण आपल्या बऱ्याचशा स्नायूंचा वापर करत नाही अश्या परिस्थितीत आपल्याला  जमिनीवर बसल्यावर उठायला त्रास होतो. जर आपण देखील त्यापैकी एक आहात, ज्यांना जमिनीवर बसण्यापेक्षा खुर्चीवर बसणं जास्त आवडत, तर एकदा जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून घ्या, नक्कीच आपण फायदे जाणून घेतल्यावर खुर्ची वर बसणं नेहमीसाठी विसराल.
 
जर आपण जमिनीवर बसलात तर अशामुळे शरीराची मुद्रा सुधारते. ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते, जमिनीवर बसून आपोआप त्यात सुधारणा येते.
 
जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात.
 
जमिनीवर बसल्याने आतील स्नायू देखील बळकट होतात. जर आपल्याला पाठदुखीचा त्रास आहे तर जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.
 
जमिनीवर मांडी घालून बसल्याने कुल्ह्याचे स्नायू बळकट होतात.
 
जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो, ज्यामुळे शरीरात लवचीकपणा वाढतो, जे खुर्चीवर बसून नाही होत. बऱ्याच वेळ खुर्चीवर बसून गुडघ्यामागील शिरा ताठ होतात, ज्यामुळे त्या वेदनेला कारणीभूत असतात.
 
जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहत आणि अन्न पचन चांगले होते. ते असे की आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो, तेव्हा आपण पुढे मागे जातो आणि या प्रक्रियेत पोटाच्या स्नायूंवर दाब पडतो.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : वेगवेगळ्या भाज्यांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ या..