Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

Conjunctivitis डोळ्यांची साथ पसरली, लक्षण आणि उपाय जाणून घ्या

Conjunctivitis Symptoms Cause Treatment
, गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (15:55 IST)
Conjunctivitis नेत्रश्लेषणाचा दाह म्हणजेच डोळ्यांचा फ्लू देशभरातील अनेक राज्यांमध्ये कहर करत आहे. अनेक राज्यात प्रत्येक दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यक्तीला जळजळ, खाज सुटणे, डोळे लाल होणे आणि डोळ्यांतून रक्तस्त्राव होत आहे. काही प्रकरणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्या आहेत. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात होणारा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा रोग या वेळी अधिक संसर्गजन्य असतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या संसर्गाचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे 6 पट जास्त असल्याचे सांगितले जाते. चिंतेची बाब म्हणजे या वेळी संक्रमित व्यक्तीला स्पर्श करूनही त्याचा प्रसार होत आहे. ज्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यांच्या कॉर्नियाला म्हणजेच डोळ्याच्या मागील भागाला सूज येऊ लागली आहे. अशी काही प्रकरणे देखील आहेत ज्यात डोळ्यांमधून रक्त येणे देखील कॉर्नियाला नुकसान करते.
 
जर आपण मध्य प्रदेशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरबद्दल बोललो तर, डॉक्टरांच्या मते दररोज सुमारे 25 ते 30 टक्के रुग्ण प्रत्येक ओपीडीमध्ये फक्त कन्जेक्टिव्हायटीसच्या त्रासामुळे येत आहेत. कन्जेक्टिव्हायटीस म्हणजे नेमकं काय आणि याला कसे टाळावे याबाबद वेबदुनियाने डॉक्टरांशी विशेष चर्चा केली आणि उपचाराबद्दल देखील जाणून घेतलं- 
 
आय स्पेशलिस्ट काय म्हणाले-
प्रत्येक ओपीडी मध्ये दररोज 30 टक्के रुग्ण
इंदूरमधील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित सोलंकी यांनी वेबदुनियाला एका चर्चेत सांगितले की, सध्या प्रत्येक ओपीडीमध्ये कन्जेक्टिव्हायटीससाठी सुमारे 25 ते 30 टक्के रुग्ण येत आहेत. सहसा ते हंगामी आणि सामान्य असते, परंतु यावेळी ते अधिक पसरत आहे. असे दोन कारणांमुळे होते असल्याचे डॉ. सोळंकी यांनी सांगितले. एक व्हायरल आणि दुसरा बॅक्टेरियामुळे. बहुतेक डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह विषाणूमुळे होतो. जोपर्यंत त्याच्या घटनेच्या कारणाचा संबंध आहे, तो पावसाळ्यात घडतो कारण या ऋतूत विषाणू आणि जीवाणू सहजपणे आपले स्थान बनवतात. हा एडेनो विषाणू सामान्य आहे, परंतु उपचार घेणे आवश्यक आहे. हे सहसा तीन ते चार दिवस टिकते, परंतु यावेळी ते अधिक व्यापक आहे आणि सुमारे सात दिवस टिकते.
 
बघण्याने पसरत नाही : डॉ अमित सोळंकी यांनी याबाबत अनेक गैरसमज असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की हा आजार कोरोनासारखा हवेत पसरत नाही किंवा संक्रमित रुग्णाच्या डोळ्यात बघूनही पसरत नाही. त्यांनी सांगितले की हे प्रामुख्याने हाताने डोळ्यांच्या संपर्कातून होते. लक्षणे वेळीच समजून घेतल्यास तो बरा होऊ शकतो.
 
कन्जेक्टिव्हायटीस कोण-कोणत्या राज्यांमध्ये पसरत आहे?
कन्जेक्टिव्हायटीस मुख्य रूपात विजयवाडा आणि श्रीकाकुलम ते एनटीआर जिल्ह्यात पसरत आहे. तर उत्तर प्रदेश आणि बिहार देखील यात सामील आहे. दिल्ली आणि  एनसीआर पर्यंत याचे रुग्ण आहेत. देशाच्या अनेक भागांमध्ये संततधार पावसामुळे कंजेक्टीव्हायटीस प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्याला लाल डोळे देखील म्हणतात. गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रात कंजेक्टीव्हायटीस प्रकरणांमध्ये वाढ झाली असून राज्यात 31 जुलैपर्यंत जवळपास 88 हजार रुग्णांचे प्रकरणे नोंदली गेली आहे. विशेष म्हणजे ही केवळ शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे.
 
कन्जेक्टिव्हायटीस अनेक कारणांमुळे होतो, उपचार त्याच्या कारणावर अवलंबून असतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, रसायनांच्या संपर्कात आल्याने होणारा कन्जेक्टिव्हायटीस 1-2 दिवसात स्वतःच साफ होतो.
इतर कारणांमुळे होणाऱ्या कन्जेक्टिव्हायटीससाठी विशिष्ट उपचार पर्याय उपलब्ध आहेत.
 
कन्जेक्टिव्हायटीसचे प्रकार
व्हायरल कन्जेक्टिव्हायटीस : व्हायरल कन्जेक्टिव्हायटीससाठी कोणताही उपचार उपलब्ध नाही. 7-8 दिवसात याच्या लक्षणांमध्ये आपोआप सुधार येतो. तसं वार्म कम्प्रेस (कपड्याला हलक गरम पाण्यात बुडुवून डोळ्यांवर ठेवल्याने) आराम मिळतो.
 
बॅक्टेरियल कन्जेक्टिव्हायटीस : बॅक्टेरियल संसर्गावर एंटीबायोटिक्स सर्वात सामान्य उपचार आहे. बॅक्टेरियल कन्जेक्टिव्हायटीसमध्ये एंटीबायोटिक्स आय ड्रॉप्स आणि ऑइंटमेंट वापरल्याने काही दिवसात डोळे सामान्य आणि निरोगी होऊ लागतात.
 
एलर्जिक कन्जेक्टिव्हायटीस : एलर्जिक कन्जेक्टिव्हायटीसमध्ये इतर लक्षणांसोबतच डोळ्यांना सूज येणे ही दिसून येते. म्हणून त्याच्या उपचारात अँटी-हिस्टामाइन आय ड्रॉप्ससह अँटी-इंफ्लेमेटरी आय ड्रॉप्स देखील दिले जातात.
 
लक्षण
- डोळे लाल होऊन खाज सुटणे
- अधिक पाणी, चिपड्या येणे
- डोळ्यात डंक येणे, सूज येणे
- एक किंवा दोन्ही डोळ्यांचे लाल किंवा गुलाबी स्वरूप
- एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये जळजळ किंवा खाज सुटणे
- आसामान्यपेक्षा अधिक अश्रु निघणे
- डोळ्यांतून पाणीदार किंवा जाड स्त्राव
- डोळ्यात किरकिरीची जाणवणे
 
कोणत्या स्थितीत डॉक्टरांशी संपर्क करावा?
- डोळ्यात तीव्र वेदना
- डोळ्यांमध्ये तीक्ष्ण टोचणे
- धूसर दृष्टी
- प्रकाशाची संवेदनशीलता
- डोळ्यात जास्त लालसरपणा
 
आय फ्लू का होतं?
पावसाळ्यात कमी तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे लोक जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीच्या संपर्कात येतात. यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह या सारखे संक्रमण होते.
 
खबरदारी: संसर्ग पसरण्यापासून कसे थांबवायचे?
कंजक्टिवाइटिस पसरू नये म्हणून स्वच्छता राखणे सर्वात महत्वाचे आहे, याशिवाय या गोष्टी लक्षात ठेवा.
- डोळ्यांना हाताने स्पर्श करु नये.
- टॉवेल, उशी, डोळ्यांचे सौंदर्य प्रसाधने इत्यादी तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.
- तुमचे रुमाल, उशीचे कव्हर, टॉवेल इत्यादी रोज धुवा.
- साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा.
- डोळे आणि चेहरा पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल, टॉवेल वापरा आणि स्वच्छ करा.
- नियमित प्रयोग केले जाणारे चष्मे स्वच्छ करा.
- संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी गडद काळा चष्मा घाला.
- पुरेश्या प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा.
- थेट सूर्यप्रकाश, माती-धूळ इत्यादीपासून दूर रहा.
- संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले आय ड्रॉप्स, नॅपकिन्स, डोळ्यांच्या मेकअपचे साहित्य, टॉवेल, उशाचे कव्हर इत्यादी वापरू नका.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आय ड्रॉप्स किंवा औषध वापरू नका.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UGC ने जाहीर केली 20 बनावट विद्यापीठांची यादी, विद्यार्थ्यांना सतर्कतेचा इशारा