Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Crossing your legsआपणही पायावर पाय ठेवून बसत असाल तर हे वाचून घ्या

cross legs
Negative effects of crossing your legs काय आपल्याला हे माहीत आहे की पायावर पाय ठेवून बसणे योग्य नाही. कारण याने अनेक प्रकाराचे गंभीर आजार होऊ शकतात. तर आज आम्ही आपल्याला याचे गंभीर नुकसान काय आहे ते सांगत आहोत:
 
पायावर पाय ठेवून बसल्याने ब्लड प्रेशरची समस्या आढळू शकते. तशी तर ही समस्या सामान्य झाली आहेत तरी असे बसल्याने यात वृद्धी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
ब्लड क्लॉटिंगची समस्या असल्यास या पोझिशनमध्ये बसू नये कारण याने deep vein thrombosis म्हणजे खोल रक्तवाहिनीत रक्त गोठण्याचा धोका असतो.
 
काही अध्ययनात कळून आले की पायावर पाय ठेवून बसल्याने वेरिओकोझ वेन्स च्या समस्येला सामोरा जावं लागतं. या समस्येत रक्त चुकीच्या दिशेत वाहू लागतं कारण रक्ताला चुकीच्या दिशेत वाहण्यापासून रोखणारे वॉल्व्स डेमेज होतात.
 
एका अध्ययनाप्रमाणे सतत तीन तास याच पोझिशनमध्ये बसणारे पुढील बाजूला वाकून जातात आणि त्यांचे खांदेही वळू लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Health Tips: नसा बळकट करण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा