आयुर्वेदात म्हटले आहेत की तांब्याचे पाणी शरीरातील बऱ्याच दोषांना शांत करतं. तसेच या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात. आपल्याला हे सांगू इच्छितो की तांब्याच्या भांड्यात साचलेले पाणी ताम्रजल म्हणून ओळखले जाते. हे पाणी पूर्णपणे शुद्ध असत. हे सर्व प्रकाराच्या जिवाणूंचा नायनाट करतो. तसेच हे माहित असावे की तांब्याच्या भांड्यात पाणी किमान 8 तास ठेवलेले असावे.तांब्यामध्ये पाणी ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ या -
* अतिसार, कावीळ, आव किंवा आमांश सारख्या आजाराशी लढायला खूप उपयुक्त आहे.
* पोटात दुखणे, गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या त्रासापासून त्वरित मुक्ती मिळते, तसेच हे पाणी पिण्यामुळे कधीही काही समस्या उद्भवत नाही.
* तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्यानं कर्करोगाच्या समस्ये विरुद्ध लढण्याची समस्या वाढते. कारण यामध्ये कर्कविरोधी घटक असतात.
* शरीरातील जखमा अंतर्गत किंवा बाह्य असतील त्वरित बरे होण्यात मदत करणे फायदेशीर ठरते.
* तांबा हे प्यूरिफायरचे काम करतं. पाण्यातील अशुद्धींना दूर करतं.
* हे प्यायल्यानं पोटाच्या आतड्यांची घाण स्वच्छ करत आतड्या स्वच्छ झाल्यामुळे शरीरावर चांगला प्रभाव पडतो.
* तांबा हे रक्तशुद्ध करण्याचे काम करतो. या मुळे त्वचेशी निगडित त्रास बरे होतात.
* कोलेस्ट्राल कमी करण्यात मदत करतं.
* शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी तांब्याचे पाणी प्रभावी आहे. या शिवाय हे लिव्हर आणि किडनीला निरोगी ठेवतं आणि कोणत्याही प्रकाराच्या संसर्गाला सामोरी जाण्यास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी फायदेशीर असतं.