Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक

या 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक
तरुणांच्या आहारासंबंधी सवयी आरोग्यासाठी धोकादायक असून त्या बदलणे सोपे काम नाही. म्हणूनच सर्व सवयी एकत्र बदलण्याचा प्रयत्न करू नये. एक एक करून या सवयी बदलल्या जाऊ शकतात. स्वत:च्या हिशोबाने सर्वप्रथम सर्वात वाईट सवय निवडा आणि ती बदला.

1. बेड टी आरोग्यासाठी बेड


 
बेड टी घेण्याने शरीरात आम्लता आणि गॅसची तक्रार होऊ शकते. म्हणूनच बेड टी ऐवजी कोमट पाण्यात मध किंवा ‍लिंबाचा रस घोळून प्यावे. याने पचन क्रिया चांगली होते, प्रतिरोधक क्षमता वाढते आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो. याच्या एका तासानंतर चहा घेऊ शकता. ही सवय लागल्याशिवाय दुसरी सवय बदलण्याचा प्रयत्न करू नये.

2. जंक फूडला टाळा
संध्याकाळी नमकीन, पिझ्झा, बर्गर किंवा तळकट पदार्थ खाणे वाईट सवय आहे. याने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नसून हे फक्त पोट भरण्यासाठी उपयोगी पडतं. याने वजन तर वाढतच आणि जेवण्याची इच्छाही कमी होत जाते.

webdunia

 
संध्याकाळी भूक लागल्यावर फळं खावी.

3. भरपूर पाणी प्या
कमी पाणी पिण्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटातील इतर विकार होऊ शकतात.

webdunia

 
दिवसातून कमीत कमी तीन ते चार लीटर पाणी प्यावे.

4. फायबर आवश्यक आहे
जेवणात फायबर पदार्थ न घेणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

webdunia


म्हणूनच ब्रेड, बिस्किट याऐवजी पोळी, ओट्स, आणि फळांचा ज्यूस भरपूर मात्रेत सेवन करायला हवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फळांनी वाढवा तुमच्या त्वचेचं सौंदर्य