Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Constipation Remedies सकाळी पोट साफ होत नसेल तर ही एक वस्तू पाण्यात भिजवून खा

Constipation Remedies सकाळी पोट साफ होत नसेल तर ही एक वस्तू पाण्यात भिजवून खा
Fig For Constipation: बद्धकोष्ठतेवर उपचार न केल्यास दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमुळे वेदना आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. तर सौम्य बद्धकोष्ठता काही प्रतिबंधात्मक घरगुती उपायांनी टाळता येऊ शकते.
 
यासाठी येथे आम्ही घरगुती उपाय सांगत आहोत. 2 वाळलेले अंजीर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे. नंतर सकाळी याचे सेवन करावे.
 
या समस्येवर अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. अंजीर पाण्यात भिजवल्याने शरीराला ते चांगले पचण्यास मदत होते. फायबरचे दोन प्रकार आहेत: विद्रव्य फायबर आणि अद्राव्य फायबर. म्हणून जेव्हा तुम्ही अंजीर पाण्यात भिजवतात तेव्हा विरघळणारे फायबर तुटते आणि वापरणे सोपे होते.
 
अंजीर अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक फळ आहे. या फळाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अंजीर जांभळे आणि हिरव्या अशा विविध रंगात येतात. फळ गोड, रसाळ आणि कुरकुरीत बियांनी भरलेले असतं. भारतात बहुतेक गोड आणि रसाळ फळ वाळलेल्या स्वरूपात सापडतं तसं पण वाळलेल्या अंजीरांच्या तुलनेत ताज्या अंजीरमध्ये कॅलरी आणि साखर कमी असते, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय बनतात.
 
सुके अंजीर देखील कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. अंजीरमध्ये अ, ब जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. फायबर युक्त अंजीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. निरोगी पचन राखण्यासाठी फायबर देखील खूप महत्वाचे आहे. कदाचित म्हणूनच भिजवलेले अंजीर खाणे हा बद्धकोष्ठता बरा करण्यासाठी भारतातील सर्वात विश्वासार्ह घरगुती उपाय आहे.
 
अंजीर फायबरचा उत्तम स्रोत आहे. निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता कमी करण्यात प्रभावी ठरू शकते. फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतं.
 
अस्वीकरण: ही सामग्री केवळ सल्ल्यासह सामान्य माहिती प्रदान करते. कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Preserve Pickles लोणची टिकवण्यासाठी काही उपाय