Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Eat mosambi in summer उन्हाळ्यात मोसंबी खा आणि निरोगी रहा

Mosambi
, शनिवार, 25 मार्च 2023 (15:11 IST)
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.. जीव नकोसा होत आहे ना.. मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
 
मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.
 
मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
 
मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी . मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात.
 
मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Master of Human Resource Management : मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसे करावे पात्रता, शीर्ष महाविद्यालय, व्याप्ती ,पगार जाणून घ्या