Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

raisins water benefits for skin
, मंगळवार, 30 एप्रिल 2024 (16:38 IST)
मनुका चांगली झोप लागण्यापासून तर पाचन तंत्र सुरळीत कारण्यापर्यंत फायदेशीर आहे. मनुकाला किशमिश नावाने देखील ओळखले जाते. मनुका म्हणजे वाळलेले द्राक्ष जे अनेक वर्षांपासून औषधी गुणांनी उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते. झोपण्यापूर्वी दोन मनुका खाल्यास चांगली झोप लागते तसेच पाचनात सुधारणा होते. हृदयाचे आरोग्य वाढते. 
 
1. मनुका मध्ये मेलाटोनीन नावाचे हार्मोन असते. जे चांगली झोप येण्यासाठी प्रभावी असते. एका अध्ययन मध्ये माहिती झाले आहे की झोपण्यापूर्वी मनुका खाणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या घेणाऱ्या लोकांपेक्षा चांगली व सुरक्षित झोप लागते. 
 
2. मनुका मध्ये घुलनशील आणि अघुलनशील असे दोन प्रकारचे फायबर आहे. घुलनशील फायबर पाण्यात वितळून जाते. व एक जेल सारखा पदार्थ बनतो जे पचनाला व्यवस्थित करते व रक्त शर्कराच्या स्तराला नियंत्रित करण्यास मदत करते. आघुलनशील फायबर पाचनतंत्र सुधारते. झोपण्यापूर्वी मनुका खाल्यास आरोग्याला खूप फायदा होतो. 
 
3. हृदयाचे आरोग्य वाढवते मनुका. मनुका मध्ये पोटॅशियम, मॅग्नाशीयम, अँटीऑक्सीडेंट असतात. जे हृदयाच्या आरोग्याला वाढवते. पोटॅशियम रक्तचापला नियंत्रित करण्यास मदत करते. मॅग्नाशीयम हृदयाच्या स्नायूंना कार्य करण्यात मदत करते. अँटीऑक्सीडेंट हृदयाला मुक्त कणांपासून होणाऱ्या नुकसान पासून वाचवते. 
 
4. मनुका रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच हाडांना मजबूत करते, मनुकामध्ये आयरन असते जे एनिमिया थांबवण्यासाठी मदत करते. तसेच मनुका त्वचेचे वय होण्याची प्रक्रिया हळू करते. 
 
*सावधानी-
जर तुम्ही मधुमेह किंवा हायपोग्लइसिमीया या आजारांनी ग्रस्त असाल तर मनुका खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनुका मध्ये नैसर्गिक साखर असते जी तुमच्या ब्लडप्रेशरला वाढवू शकते. जर तुम्हाला मनुकाची एलर्जी असेल तर मनुका खाणे टाळावे.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केस गळती थांबवते बडीशेप, जाणून घ्या कसा करावा उपयोग