उष्माघात-उन्हाळ्याच्या हंगामात तापलेल्या उन्हाशिवाय सर्वात मोठी समस्या म्हणजे रणरणते ऊन, उष्माघात होणे तापमानात वाढ झाल्याबरोबर सनस्ट्रोकचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत काही बदल देखील आवश्यक आहेत जेणेकरुन आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला तर शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि बेशुद्धपणा सारख्या समस्या दिसून येतात. हिट स्ट्रोक टाळण्यासाठी आपण काय करावे ते जाणून घ्या.
1 दुपारच्या रणरणत्या उन्हात घरातून बाहेर पडू नका.
2 शक्य असल्यास डोळ्यावर सनग्लासेस लावा.
3 उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे.हे उष्माघातापासून संरक्षण करतो.
4 शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.दिवसभरातून किमान 8 -10 ग्लास पाणी प्यावे. अन्यथा पाण्याच्या कमतरतेमुळे निर्जलीकरण होऊ शकतं.
5 आपल्या आहारात कच्चा कांदा समाविष्ट करा.कच्चा कांदा उन्हाळ्यात फायदेशीर मानला आहे.
6 दिवसात दही,कैरीचे पन्हे,ताकाचे सेवन नक्की करा.
7 या दिवसात लिंबूपाणी शरीरातील उष्णतेला बाहेर काढून थंडावा
देतो.या साठी 1 ग्लास पाण्यात अर्धा लिंबू आणि 2 लहान चमचे साखर मिसळून लिंबूपाणी बनवून प्यावे.