आपण कधी असे अनुभवले आहेत का? की चालता बसता उठता आपल्या सांध्यांमधून कट -कट आवाज येत आहे. जर का होय, तर ह्याला अजिबात दुर्लक्षित करू नका. हे हाडांच्या गंभीर समस्येचे लक्षणे असू शकतात. हाडांमधून पुन्हा -पुन्हा असे आवाज येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खालील दिलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानं आपल्याला या त्रासापासून मुक्ती मिळेल.
1 मेथी
दाणे - मेथी दाण्याचं सेवन केल्यानं हांड्याना फायदेशीर असतं. या साठी रात्री अर्धा चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून द्यावे, सकाळी मेथी दाणे चावून-चावून खावं आणि या पाण्याला प्यावं. असे नियमित केल्यानं हाडांमधून आवाज येणं थांबण्यात मदत होईल.
2 दूध प्या - हाडांमधून कट कट आवाज येण्याचे अर्थ आहे की त्यामधील लुब्रिकेंट कमतरता होणं. सरत्या वयात हा त्रास वाढू लागतो. म्हणून शरीरास पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम देणं गरजेचं असतं. कॅल्शियमचे इतर पर्याय घेण्याव्यतिरिक्त भरपूर दूध प्या.
3 गूळ आणि हरभरे खावं - भाजके हरभऱ्यासह गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानले जाते. भाजक्या हरभऱ्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिनं, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतं. दिवसातून एकदा तरी गूळ आणि भाजके हरभरे खावे. या मुळे हाडांची कमतरता दूर होईल आणि हाडांमधून कट-कट आवाज येणं देखील थांबेल.