आपल्या चपलांमुळे घरात तर येत नाहीये कोरोना व्हायरस, जाणून घ्या डिसइनफेक्ट करण्याची ‍पद्धत

मंगळवार, 30 जून 2020 (07:25 IST)
जगभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहेत. पण आर्थिक दृष्ट्या तोटा होत असल्याने बऱ्याच देशांमध्ये लोक डाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. भारतात देखील दुकान- ऑफिस उघडले आहेत. ज्या मुळे लोकांचे बाहेर ये- जा सुरू आहे. अशात कोरोना विषाणूंचा धोका देखील वाढला आहे. अश्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे की बाहेर कुठून ही कोरोनाचा संसर्ग येता कामा नये. तसं तर स्वच्छतेसाठी लोकं जागरूक झाले आहेत. पण आपल्या जोड्यांकडे कोणाचे ही लक्ष दिले जात नाही. आपल्याला आपले हात स्वच्छ ठेवण्यासारखेच आपल्या जोडे-चपलाच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया की आपली पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी काही टिप्स
 
तज्ज्ञांप्रमाणे आजार पसरवणारे संसर्गजन्य आजार आणि बॅक्टेरिया आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ आपल्या बुटांवर राहू शकतात. हातांना संसर्गापासून वाचविण्यासाठी आपण कोणत्याही वस्तूंना स्पर्श करण्या आधी ग्लव्ज घालतो किंवा स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुतो. अश्याच प्रकारे आपल्याला आपल्या पादत्राण्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. 
 
बाहेर जाण्यासाठी जोड्याचा निश्चित सेट असावा. 
आपल्या सहकाऱ्यांसह आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना विषाणूंचे प्रसरण रोखण्यासाठी आपल्याला आपल्या पादत्राणांच्या स्वच्छतेसाठी विशेष लक्ष द्यायला हवं. जर आपण बाहेर जात आहात, तर दररोज अदलून बदलून चपला वापरू नये. बाहेर जाण्यासाठी 
एकच जोडे किंवा चपला वापराव्या. 
 
पादत्राणांना निर्जंतुक करण्याची पद्धत 
घर आणि बाहेर जाण्यासाठी वेग- वेगळे पादत्राणे वापरून आपण कोरोनाच्या विषाणूंना आपल्या घरात येण्यापासून रोखू शकतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. पादत्राणे काढताना नुसत्या हाताने काढणे टाळा. तळपायाची घाण जमिनीला लागल्यावर कोरोनाचे संसर्ग पसरू शकतो. त्यासाठी डोर मॅट वापरावे. पादत्राणांना ठराविक जागेवर ठेवावे. पादत्राणांच्या बाहेरची बाजू गरम रुमालाने किंवा जुनाट कापड्याने पुसून काढावे. या व्यतिरिक्त आपण पादत्राणे स्वच्छ करण्यासाठी निर्जंतुक वाईप्स देखील वापरू शकता. बुटांच्या आत जंतांना मारण्यासाठी आपण निर्जंतुक द्रव्याची फवारणी करू शकता. बूट काढून ते वाळविण्यासाठी मोकळ्या हवेत ठेवावे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख Weight loss: नियमितपणे दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे जाणून घ्या