फिट राहण्यासाठी बरेच लोकं व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करतात आणि ते त्यांना आवडतं. जेणे करून ते फिट आणि सक्रिय राहू शकतात. व्यायाम शाळेत किंवा जिम खाण्यात व्यायाम करताना आपल्यायाला मानसिक दृष्टया स्थिर राहणं महत्वाचं असत. जेणे करून आपल्याला चांगले परिणाम मिळतील. परंतु काही लोकं वर्क आउटच्या दरम्यान काही कळत-नकळत चुका करतात ज्यामुळे त्यांचं संपूर्ण वर्कआउट सत्र वाया जातं. जर आपण देखील जिम खाण्यात जात असाल, तर या गोष्टीना लक्षात घ्या.
जिम जाण्याचे वेळापत्रक निर्धारित करा -
काही लोकं जिममध्ये कधीही जातात कधी इच्छा झाल्यास सकाळी तर कधी संध्याकाळी. त्यांचं काही वेळापत्रक नसतं. त्या कारणास्तव ते योग्य वेळी जिम मध्ये व्यायाम करू शकत नाही. म्हणून आपले वेळापत्रक निश्चित करावं आणि त्याच वेळी जिम जावं.
वर्क आउटच्या कपड्यांची काळजी घेणं-
जिमखाण्यात व्यायामासाठी जाताना वर्कआउट करण्यासाठी आपण एक योग्य असा ड्रेस तयार करा. जेणे करून आपणास शरीराला स्ट्रेचिंग करताना चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकाल. अति घट्ट किंवा सैलसर कपडे घालू नका. ज्यामुळे आपल्याला व्यायाम करताना काही त्रास होऊ नये. म्हणून वर्क आउट कपडे व्यवस्थित निवडावे.
प्री-वर्कआउट मील -
आपण जिम जाण्यापूर्वी प्री -वर्कआउट मील घेत नसाल तर आपण आपले संपूर्ण वर्क आउट सत्र खराब करतं आहात. प्री -वर्क आउट मील घेणं महत्वाचं असत. हे आपल्याला जिम मध्ये भार उचलण्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करतं.
वर्क आउट च्या ऐवजी मोबाईलवर लक्ष -
जर आपण वारंवार मोबाईलवर सूचनांना तपासत असाल, तर आपण आपले वेळ वाया घालवत आहात. या मुळे आपण जिम मध्ये असून देखील वर्कआउट कडे लक्ष देऊ शकत नाही. कारण आपले लक्ष पुन्हा पुन्हा मोबाईल कडे जातं म्हणून वर्कआउट करताना आपले मोबाइल आपल्या पासून लांबच ठेवा.