Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वजन वाढलंय ? मग हे उपाय करुन बघा....

वजन वाढलंय ? मग हे उपाय करुन बघा....
, मंगळवार, 14 एप्रिल 2020 (09:10 IST)
प्रत्येक व्यक्ती ताजेतवाने दिसण्यासाठी काही न काही करतं असतो. जेणे करून आपण फिट आणि तंदुरुस्त दिसायला हवं. आपण त्यासाठी बरंच काही करत असतो कधी डायटिंग करतो तर कधी जिम मध्ये जाऊन तासन्तास वर्कआउट करत असतो पण एवढं करून ही बघावा तसा फायदा होत नाही. आणि आपल्याला नैराश्य येते. आणि वजन परत वाढलेलेच. म्हणून आम्ही आज आपल्याला काही उपाय सांगत आहोत जेणे करून आपले वजन कमी होईल आणि आपण फिट आणि स्फूर्तीवान दिसाल. चला मग जाणून घेऊ या...
 
* ताणतणाव दूर ठेवा- कधी कधी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वागून देखील काही उपयोग होत नाही आणि वजन वाढतच राहते. त्यासाठीचे ताण तणाव घेऊ नका.
 
* तळण कमी खावं - आपल्या जेवण्यात तेलकट आणि तुपकट कमी खावे. तळलेल्या पदार्थामध्ये कॅलोरी जास्त प्रमाणात असते ज्या मुळे शरीरात फॅट्स वाढते आणि त्यामुळे शरीर स्थूल होतं आणि वजन वाढते.
 
* तांदळाचा वापर कमी करावा -  आपल्या सर्वांचा घरात दररोज भात बनवला जातो. असे म्हटले जाते की जेवणात भात नसेल तर ते जेवण संपूर्ण नसते. पण भाताच्या सेवनाने वजन वाढते कारण भातात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वात आणि वजन दोन्ही वाढते. आपण पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राऊन तांदळाचा वापर करावा. ह्यात कॅलरीच प्रमाण कमी असतं. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ह्यामध्ये ग्लॅसिमिक इंडेक्स कमी प्रमाणात आढळतं.
 
* आहाराच्या प्रमाणाकडे लक्ष द्या - काहीवेळा आपण वजन कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश नाही करतं आणि एखाद्या वेळा ते पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही आणि आपण ती खातो. पण असे केल्याने आपल्या केल्याचे सार्थक होणार नाही त्यामुळे असं करण्याचा मोह टाळा.
 
* न्याहारी घेणे- काही जण स्वतःला फिट दिसण्यासाठी कमी खातात. सकाळची न्याहारी सुद्धा घेत नाही का तर वजन वाढू द्यायचे नाही म्हणून. असं केल्यानं गॅस आणि पोटफुगी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. सकाळची न्याहारी पौष्टिक घेणे सर्वात उत्तम, त्यामुळे आपणास सारखी सारखी भूक लागणार नाही. आपण ओट सारखे पौष्टिक पदार्थ घेऊ शकता.
 
* आहाराची वेळ निर्धारित करा - एकाच बसणीचे जेवण करण्यापेक्षा दिवसातून 4 ते 5 वेळा थोडं थोडं करून आहार घ्यावा. आहारात तळलेले पदार्थ घेण्यापेक्षा वाफवलेले किंवा भाजके पदार्थांचा समावेश करावा.
 
आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार कार्य करावे आणि काहीही करण्याच्या आधी योग्य तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केस गळती रोखेल कडीपत्ता आणि जास्वंद तेल