Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (21:25 IST)
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडले आहे. कोरोनाचा नवीन रुप अत्यंत संक्रामक आहे आणि जरा दुर्लक्ष केल्याने धोका वाढू शकतो. मागील वर्षापेक्षा कोरोना व्हायरस अधिक धोकादायक दिसून येत आहे. या दुसर्‍या लाटीत तरुण वर्गाला घात बसत आहे.
 
या साथीच्या आजारावर उपचार उपलब्ध नसल्यामुळे केवळ इम्यून सिस्टमला बूस्ट करुन या आजावर मात करता येऊ शकते. यासाठी आपली जीवनशैली देखील सुरुळीत असावी. आपला आहार, आपली दिनचर्या योग्य नसल्यास या आजराला बळी पडू शकता. या काळात योग्य आहार कसा असावा हे WHO द्वारे सांगण्यात आलं आहे-

डब्ल्यूएचओ द्वारा जारी करण्यात आलेल्या फूड गाइडमध्ये सांगण्यात आलं आहे की अधिकाधिक ताजे फळं, कच्च्या भाज्या किंवा अनप्रोसेस्ड भाज्याचे सेवन करावे. 
 
आपल्या शरीराला आवश्यक व्हिटॅ‍मिन, मिनरल्स, फायबर, प्रोटीन मिळत राहतील. भाज्या सेवन करण्याची योग्य पद्धत 
 
- डब्ल्यूएचओने सांगितलं की भाज्या चांगल्या शिजवून खाल्ल्याने त्याचे पोषक तत्व नष्ट होतात म्हणून भाज्या वाफवून खाणे योग्य ठरेल. 
 
- संध्याकाळी भूक लागल्यावर कच्च्या भाज्या किंवा ताजे फळं खावे. याने आपल्या शरीराला पोषक तत्तव मिळतील. तसेच आपण डबाबंद भाज्या ‍किंवा फळं खात असाल त्यात मीठ किंवा साखर नसावी. हे दोन्ही शरीरासाठी नुकसानदायक आहे.
 
एका अजून रिर्पोटप्रमाणे कोरोना व्हायरस साथीच्या आजारात आपलं डायट प्लान योग्य असावं तर जाणून घ्या कशा प्रकारे होईल इम्युनिटी बूस्ट-
 
इम्यूनिटी बूस्टर फूड्स
ड्रमस्टिक - यात आढळणारे घटक आपल्या इम्यूनिटीला बूस्ट करण्यास मदत करतील. हे सुपरफूड म्हणून ओळखलं जातं.
 
नारळ पाणी - नारळ पाण्याने शरीरात फ्रेशनेस राहते. कमजोरी जाणवत असल्यास लगेच नारळ पाणी प्यावं. याने शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होईल आणि ताजेतवाने राहाल.
 
कांदा, लसूण आणि हळद - कोणत्याही प्रकाराच्या आजारावर या तिन्ही गोष्टी रामबाण उपाय आहे. याने इम्युनिटी बूस्ट होते.
 
मिक्स बिया - अळशी, सूरजमूखी आणि भोपळ्याच्या बिया यात नैसर्गिक घटक आढळतात. याने व्हिटॅमिन ई, फायबर, मॅग्निशियम व आयरन भरपूर प्रमणात आढळतं.
 
अळशी - याला जवस देखील म्हणतात. परदेशात याला फार डिमांड असते. यात भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळतं. ओमेगा-3 अळशीमध्ये भरपूर प्रमाणात असल्याने हे हार्ट पेशेंटसाठी उपयोगी मानली गेली आहे.
 
सूरजमूखी बिया - यात व्हिटॅमिन बी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतं. व्हिटॅमिन ई आपल्यातील पेशींचे संरक्षण करते. कर्करोग सारख्या आजरापासून लढण्यात मदत करतं. गर्भवती महिलांना देखील या ‍बियांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
 
भोपळ्याच्या बिया - यात व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतं. यात मॅग्निशियम, आयरन, जिंक आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतं. याचे सेवन केल्याने मानसिक ताण आणि डिप्रेशन सारख्या आजारावर आराम मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघुकथा म्हणजे काय?