काही पथ्यं पाळल्यास घरच्या घरीही जाडी कमी करण्याचा रामबाण उपाय सापडू शकतो. जाडी कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर प्रोसेस्ड फूडपासून दूर रहा. कितीही आकर्षक वेष्टनात असले तरी या पदार्थांमध्ये फॅटच तसेच मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर जाडीस उपकारक असे अनेक घटक यात आढळतात.
जेवणात बटाटा आणि भात यांचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी डाळ, हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवा.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन तीन तास आधी घ्या. जेवणानंतर शतपावली करा. यामुळे पचन सुलभ होऊन शांत झोप लागते. त्याचप्रमाणे जाडीही कमी होते.
शारीरिक श्रम आणि वातावरण यानुसार आहाराचे स्वरूप आणि मात्रा ठरवा. दिवसभरात पर्याप्त प्रमाणात पाणी प्या.