मुंबईः हिंदू नववर्ष गुढी पाडव्याचा सण उद्या असून हा सण साजरा करण्यासाठी गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार सकाळी 7 ते रात्रो 8 वाजण्यापूर्वी गुढी पाडव्याचा सण साजरा कऱणे अपेक्षित आहे. तसेच यादिवशी कोणत्याही स्वरूपाची बाईक रॅली, मिरवणूका, प्रभात फेरी काढण्यास राज्य सरकारने मज्जाव केला. तसेच 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येवू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे.
त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गुढी पाढव्याचा सण हा साधेपणाने साजरा करावा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करावे, कोरोना, डेंग्यु, मलेरीया इत्यादी आजारासंदर्भात आणि त्याला रोखण्याच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन कारावे असे आवाहनही गृहविभागाने केले. यासंदर्भात राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत.