Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चरबी कमी करण्यासाठी हे खा

चरबी कमी करण्यासाठी हे खा
दुधीभोपळा
 
यात भरपूर मात्रेत फायबर असतं आणि फॅट्सची मात्रा नगण्य असते. जर आपण आहारात दुधीभोपळ्याचे अधिक सेवन केले तर याचे परिणाम दिसून येतील.

 

कोबी
 
यात टारटेरिक अॅसिड आढळतं जे शरीरातील अतिरिक्त चरबी दूर करतं. आपण खूप गोड खात असल्यास फॅट लेवल वाढतं पण कोबी गोड पदार्थांना फॅट्समध्ये परिवर्तित होण्यापासून रोखते.

webdunia

टोमॅटो
 
टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटामिन सी शरीरात इम्यून सिस्टमला हेल्थी बनवतं. वजन कमी करण्यात हे फार उपयोग आहेत.

webdunia


 

पपई
 
पपई खाल्ल्याने गॅससंबंधित तक्रार दूर होते. पपई शरीरातील पचन तंत्राला दुरुस्त ठेवतं. वजन कमी करण्यासाठी रोज पपई खायला हवी.

webdunia

बडीशेप
 
जेवण झाल्यावर बडीशेप खाणे लाभकारी आहे. याने जेवण पचतं. जेवण्यापूर्वी बडीशेप टाकलेली चहा प्यायल्याने भूक कमी लागते आणि आपण अती आहारा घेण्यापासून वाचतो.

webdunia

पाणी
 
जेवण्यापूर्वी योग्य मात्रेत पाणी पिण्याने वजन नियंत्रित राहतं. पाणी पोटात जागा बनवून घेतं ज्याने आपण अती आहार सेवन करण्यापासून वाचतो. पण जेवण झाल्यावर पाणी पिणे टाळावे.

webdunia

हळद
 
रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लहान चमचा हळद कोमट पाण्यासोबत सेवन करावी. याने वजन नियंत्रित राहील. याने इन्फेक्शन आणि इतर संभाव्य धोके टळतील.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स