हिंदू धर्मात उपवासाचे महत्त्व आहे. तसेच काही लोक नवरात्रीत नऊ दिवस उपवास करून देव आईची आराधना करतात. उपवास केल्याने फक्त भक्तीच प्रदर्शित होत नसून हे आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. पाहू उपवासाचे फायदे:
* आरोग्याच्या दृष्टीने उपवास करणे योग्य असून उपवासामुळे रोगांवर नियंत्रण केलं जाऊ शकतं. नऊ दिवस योग्य प्रकारे उपवास केल्याने सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.
* नवरात्रीत उपवास करून आपण आपल्या पोटासंबंधी तक्रारीपासून सुटका मिळवू शकता. या दरम्यान हलका आहार घेऊन मळमळणे, अॅसिडिटी, जुलाब, जळजळ सारख्या तक्रारींवर नियंत्रण करता येईल.
* लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपवास एक चांगला पर्याय आहे. योग्य डाइट प्लान करून या नऊ दिवसात आपण वजन नियंत्रित करू शकाल.
* या दिवसांमध्ये इतर दिवसांपेक्षा कमी कॅलरीज घेतल्या जातात ज्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यात मदत होते.
* बिझी लाईफमुळे रोजचा आहार प्रभावित होत असतो. अशात नऊ दिवसाच्या उपवासात आपण नव्याने आहार योजना आखू शकता.
* सामान्यतः प्रत्येक दिवशी ज्यूस आम्ही आहारात सामील करायला कंटाळ करतो किंवा ज्यूस न पिण्याचे काहीही कारणं देत असतो पण या दिवसांमध्ये ज्यूसशिवाय पर्याय नाही. म्हणून भरपूर मात्रेत फळांचा ज्यूस आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
* नऊ दिवस अटरम-शटरम खाण्यावर नियंत्रण राहण्याने आपल्या आरोग्यासह त्याच्या परिणाम आपल्या सौंदर्यांवर पण दिसून येईल. फळं, नारळ पाणी, मेवे व इतर पौष्टिक आहार घेतला जाईल ज्याने त्वचा व केसांचे सौंदर्यं वाढेल.
* उपवासच्या दरम्यान आपण फराळाच्या व्यतिरिक्त इतर पदार्थ खाण्यापिण्याचा विचार करत नसून तरल पदार्थोंचे सेवन करतो. याने शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होते आणि त्वचा हाइड्रेट होते.
* उपवास केवळ शारीरिक लाभ देत नसून याने आत्मिक शांतीपण प्राप्त होते. उपवास केल्याने मानसिक ताण दूर होतो आणि इतर समस्यांवर उपायही सापडतो. उपवास शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक शांतीचा फुल पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही.