Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Cancer : जाणून घ्या कर्करोगाचे 8 लक्षणे...

webdunia
आपल्या शरीरात होत असलेले काही बदल आपण दुर्लक्ष करतो. पण काय आपल्या माहिती आहे की यात कर्करोगातील प्रारंभिक लक्षणे असू शकतात. जाणून घ्या अशास काही लक्षणांबद्दल आणि वेळेवारी सावध व्हा:
 
थकवा
शरीरात ब्लड प्लेटलेट्स किंवा लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्यास जास्त थकवा जाणवतो. याने ल्यूकेमियाचा धोका असतो. याकडे दुर्लक्ष करू नये.वजन कमी होणे
अचानक वजन कमी होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नये. वजन कमी होण्याने कोलोन कर्करोग, लिव्हर कर्करोग किंवा पचन तंत्रासंबंधी कर्करोगाचा धोका असू शकतो.
 

कमजोरी
कमजोरी आणि थकवा कर्करोगाच्या लक्षणांमध्ये सामील आहे. भरपूर झोप घेतल्यावर किंवा मनसोप्त आराम केल्यानंतरही थकवा मिटत नसेल तर दुर्लक्ष करू नये.

webdunia

 
फोड किंवा गाठ
शरीरातील कोणत्याही भागात फोड किंवा गाठ जाणवतं असेल तर लगेच डॉक्टरकडे जावे.

कफ असणे आणि छाती दुखणे
सामान्यपेक्षा अधिक दिवसांपर्यंत कफ असणे किंवा छातीत दुखणे धोकादायक ठरू शकतं. हे ल्यूकेमिया किंवा फुफ्फुसाचा कर्करोग किंवा ब्राँकायटिसचे लक्षण असू शकतात. कधी कधी हे दुखणं खांद्यावरही जाणवतं.

webdunia

 
हिप्स किंवा पोट दुखणे
हिप्स किंवा पोटाच्या खालील बाजूला दुखणे सामान्य नाही. हे गर्भाशय कर्करोगाचे लक्षण असू शकते.

निप्पलमध्ये बदल
निप्पलच्या आकारात अचानक बदल येणे ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरू शकतं. जसे निप्पल फ्लॅट होणे, बाजूला किंवा खाली वळून जाणे. अश्या परिस्थितीत लगेच डॉक्टरला दाखवावे.

webdunia

 
मासिक पाळीच्या समस्या
मासिक पाळीच्या दरम्यान असह्य पोट आणि कंबर दुखी आणि अकाळी रक्त स्त्राव होणे, हे कर्करोगाचे लक्षण आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

हे कान कर्करोगाचे लक्षणे आहे, चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका