पेरूचे सेवन करा आणि बॉडी फिट ठेवा

आपण दररोज आपले आरोग्य निरोगी राहावे त्यासाठी विविध उपाय योजना करत असतो. यासाठी आपण फळ किंवा भाज्यांचे सेवन करतो ते आपल्या आरोग्यांच्या दृष्टीने उपयुक्त असते. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पेरू हे फळ ही लाभकारी आहे ते कसे..
 
बॉडी फिट ठेवण्यासाठी : पेरूमधील पौष्टिक तत्व शरीराला फिट आणि फाईन ठेवण्यात मदत करतात. परंतु पेरू योग्य वेळेवर खावेत. रात्री पेरू खाल्ल्यास खोकला होण्याचा धोका राहतो. 
 
वजन कमी करण्यासाठी : लठ्ठपणा वाढण्याचे मुख्य कारण कोलेस्ट्रॉल असते. पेरूमधील उपस्थित तत्व कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे वजन वाढत नाही व जर तुम्हांला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाईट मध्ये पेरूला आवर्जून स्थान द्या. 
 
महिलांमधील फर्टिलिटी वाढवण्यासाठी : पेरूमध्ये असलेले फॉलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे महिलांमधील फर्टिलिटी वाढते. जर एखाद्या महिलेला आई होण्यात अडचण निर्माण होत असेल तर त्या महिलेने दररोज पेरूचे सेवन करावे. 
डोळे उत्तम राहण्यासाठी : पेरूमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असते. जे डोळे निरोगी ठेवण्यात सक्षम ठरते. या व्यतिरिक्त पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आजारांना दूर ठेवण्यास मदत करतात. 
 
त्वचा उजळण्यासाठी : पेरूमध्ये पोटॅशिअम तत्व असल्यामुळे याच्या सेवनाने त्वचा उजळते. तसेच त्वचेवरील पुरळ, काळे डाग त्यामुळे दूर होतात. 
 
तोंड आले असल्यास : जर तुमचे तोंड आले असल्यास किंवा तुम्हांला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून -चावून खाल्ल्यास आराम मिळतो. 
 
व्हिटॅमिन सी : पेरूमध्ये संत्रीपेक्षा चार पट्टीने जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे ब्लेशप्रशेर संतुलित राहते. तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो. 
 
नशा कमी करण्यासाठी : एखाद्या व्यक्तीला दारू किंवा भांग जास्त झाल्यामुळे खूप नशा झाली असेल तर पेरूच्या पानांचा रस प्यायला दिल्यास नशा कमी होऊ शकते.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख जाडसर कणकेचे लाडू