शरीर वेगवेगळ्या आजारांना सहन करत असतो. जर आपली रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर जिवाणू आपल्या शरीरावर संक्रमण करू शकतात .असं होऊ नये त्या साठी रोग प्रतिकारक शक्ती बळकट करायची असते. या साठी काही गोष्टींना आपल्या आहारात समाविष्ट करायला पाहिजे जेणे करून शरीर निरोगी आणि दृढ राहील आणि कोणते ही आजार होणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
* पाणी- हे एक नैसर्गिक औषध आहे. भरपूर प्रमाणात शुद्ध पाणी प्यायल्याने शरीरातील साठलेले विषारी घटक बाहेर पडतात आणि प्रतिकारक शक्ती वाढते. पाणी सामान्य तापमानाचे किंवा किंचित कोमट असावे. फ्रीजचे पाणी पिणे टाळावे.
* रसदार फळ- संत्री, मोसंबी इत्यादी रसदार फळांमध्ये खनिज आणि व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते हे प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण हे फळं खाऊन किंवा त्याचे रस किंवा ज्यूसच्या स्वरूपात सेवन करू शकता.
* सुकेमेवे -काजू बदाम सारखे फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे. हे रात्री भिजत टाकून सकाळी चहा किंवा दुधासह, जेवण्याच्या अर्धा तास पूर्वी घेतल्याने फायदा होतो.
* अंकुरलेलं कडधान्य- अंकुरले कडधान्य (मठ,मूग,हरभरा) आणि भिजत घातलेल्या डाळींचे सेवन भरपूर करावे. मोड आलेले कडधान्य आपल्या आहारात सेवन केल्याने त्यामध्ये असलेले पोषक घटकांची क्षमता वाढते. हे पचविणे सोपे आहे,
* सॅलड- जेवणामध्ये सॅलडचा वापर अधिक करावा. अन्नाचे संपूर्ण पचन होण्यासाठी सॅलडचे सेवन करावे. या मध्ये काकडी, टोमॅटो, मुळा, गाजर, कोबी, कांदा,बीटरूटचे समावेश करावे. या मध्ये नैसर्गिक मीठ पुरेसे आहे वरून मीठ घालू नये.
* कोंडा किंवा ब्रान असलेले धान्य खा- गहू,ज्वारी, बाजरी, मका या धान्याचे सेवन करावे.गव्हाच्या पिठातील कोंडा खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. रोग प्रतिकारक शक्ती देखील चांगली राहील.
* तुळशी - तुळशीचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे.परंतु ही अँटिबायोटिक, वेदना निवारक आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील फायदेशीर आहे. दररोज सकाळी 3-5 पाने तुळशीची पाने खावी.
* योग- योग आणि प्राणायाम शरीराला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.एखाद्या प्रशिक्षित व्यक्ती कडून शिकल्यावर दररोज घरात सराव करून करावे.
* हसणे- हसल्याने रक्त परिसंचरण सुरू होते आणि शरीर जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेते. तणावमुक्त होऊन हसावे. या मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत मिळते.